...तरच भारत वर्ल्डकप जिंकेल : रिकी पॉंटिंग

...तरच भारत वर्ल्डकप जिंकेल : रिकी पॉंटिंग

सचिनची तुलना विराट कोहलीशी करु नका, पॉंटिंगने नेटिझनंना खडसावले.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 मार्च : ''जर भारताचा कर्णधार विराट कोहलीची बॅट चालली तर, भारत नक्कीच विश्वचषक जिंकेल'', असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याने एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. यावेळी पॉटिंगने नेटिझन्सचा क्लास घेत, ''सचिन आणि विराट कोहली यांची तुलना होऊ शकत नाही'', असे म्हणत कोहली हा माझ्यासारखा फलंदाज आहे, असेही पॉंटिंग यावेळी म्हणाला. तर, ''भारत आणि ऑस्ट्रेलिया हे वर्ल्डकपसाठीचे प्रबळ दावेदार आहेत, मात्र इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्याकडे ही विशेष लक्ष असेल, त्याचप्रमाणे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानही या विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकतात'', असेही पॉंटिंगने सांगितले.

रिकी पॉंटिंग सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्स या संघाचा मार्गदर्शक आहे. याआधी पॉंटिंगने मुंबई संघाचे कर्णधारपद भुषविले होते. ऑस्ट्रेलियाकरीता कर्णधारपद भुषवणाऱ्या पॉटिंगने कसोटीत आणि एकदिवसीय सामन्यात 13 हजारहून अधिक धावा केल्या आहेत.

''विराट कोहलीचा हा सध्याचा उत्कृष्ट फलंदाज आहे. त्याचे वनडे मधील विक्रम पाहता, मलाच हेवा वाटतो. त्याच्यामुळेच भारताचा सध्या अत्यंत धोकादायक संघ आहे. त्यामुळे विराटची बॅट चालली तरच, भारत हा विश्वचषक जिंकेल'', असा विश्वास पॉंटिंगने व्यक्त केला. त्यामुळे आता पॉंटिंगचे हे भाकित खर ठरणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.


धोनी निवृत्ती घेईल असे वाटले होते पण...

या मुलाखतीत पॉंटिंगने २०१५ वर्ल्डकपनंतर महेंद्रसिंग धोनी क्रिकेटमध्ये निवृत्त घेईल असे मला वाटलं होतं, पण त्याने त्याचा खेळ एवढा सुधारला आहे. की तो आणखी काही वर्ष नक्की खेळू शकेल. त्याच्या खेळाचे मला कौतुक वाटते, असेही पॉंटिंगने यावेळी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:21 PM IST

ताज्या बातम्या