IPL 2019 : विराटने RCBचे मानावेत आभार, गंभीरची खोचक टीका

IPL 2019 : विराटने RCBचे मानावेत आभार, गंभीरची खोचक टीका

'विराट उत्तम फलंदाज असला तरी कर्णधार म्हणून....'

  • Share this:

नवी दिल्ली, 19 मार्च : विराट कोहलीने गेल्या आयपीएलच्या 12 हंगामांपैकी 8 हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे कर्णधारपद भुषविले आहे. मात्र, अजूनपर्यंत एकदाही आरसीबीला आयपीएलचे विजेतेपद पटकावता आलेले नाही. त्यामुळे विराटने आरसीबी संघाचे आभार मानावेत, संघाने त्याला अजूनही कर्णधारपदी कायम ठेवले आहे, अशी खोचक टीका माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यांने विराटवर केली आहे.

नवी दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान गंभीरने विराटवर टीकास्त्र सोडले. विराट हा उत्तम फलंदाज असला तरी, तो झटपट निर्णय घेणारा किंवा आक्रमक रणनीती आखणारा कर्णधार नाही. त्याला अजून कर्णधारपदाबाबत खूप काही शिकण्याची गरज आहे. एकदाही आयपीएल जिंकून दिले नसताना त्याला संघाने कर्णधारपदी कायम ठेवले आहे, याचे नवल असल्याचा टोमणाही गंभीरने विराटला मारला.

गंभीरच्या या वक्तव्यात काही अंशी तथ्य आहे. कर्णधारपदाच्या बाबतीत विराट फारच नशीबवान आहे. पण बंगळुरु संघात कर्णधारपदाकरीता फारशी शर्यत नसल्यामुळे विराटचे कर्णधारपद आयपीएलचे आठ हंगामात शाबुत आहे. दरम्यान, २३ मार्चपासून आयपीएलला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेच्या केवळ पहिल्या २ आठवड्यांचेच वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आले असून या स्पर्धेचा पहिलाच सामना माजी कर्णधार धोनी विरुध्द सध्याचा कर्णधार विराट यांच्यात रंगणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

=====================================================================================

VIDEO : आगे आगे देखिए होता है क्या? मुख्यमंत्री फडणवीसांची UNCUT पत्रकार परिषद

First published: March 19, 2019, 4:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading