मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /'बरं झालं Virat Kohliकडून वनडे कॅप्टन्सी काढून घेतली' ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य

'बरं झालं Virat Kohliकडून वनडे कॅप्टन्सी काढून घेतली' ऑस्ट्रेलियन खेळाडूचे मोठे वक्तव्य

Virat Kohli

Virat Kohli

वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून विराट कोहलीला (Virat Kohli) हटवण्यात आले असून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) या टीमचा कॅप्टन असेल.

नवी दिल्ली, 12 डिसेंबर: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या आठवड्यात बरेच बदल झाले आहेत. वन-डे टीमच्या कॅप्टनपदावरून विराट कोहलीला (Virat Kohli) हटवण्यात आले असून आता रोहित शर्मा (Rohit Sharma) या टीमचा कॅप्टन असेल. या मोठ्या बदलानंतर क्रिकेट जगतातून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलियचा दिग्गज गोलंदाज ब्रॅड हॉग (ex-Australian spinner Brad Hogg) याने मोठे वक्तव्य केले आहे.

बीसीसीआयच्या या निर्णयामुळे कोहलीचे चाहते दु:खी झाले असतानाच बीसीसीआयचा हा निर्णय कोहलीसाठी वरदान ठरेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज ब्रॅड हॉग याने व्यक्त केला आहे.

ब्रॅड हॉगने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर विराटबाबत आपले मत व्यक्त केले आहे. माझ्या मते हे एक सकारात्मक पाउल आहे. कोहलीने फक्त ते स्वीकारले पाहिजे आणि पूर्णपणे रिलॅक्स राहिले पाहिजे. एकदिवसीय आणि टी-20 चे कर्णधारपद सोडल्याने कोहलीवरचा बराच दबावही कमी झाला आहे. असे मत हॉगने यावेळी व्यक्त केले.

तसेच तो पुढे म्हणाला, बीसीसीआयच्या या निर्णयामुळे विराट कोहलीला त्याच्या कामगिरीत सुधारणा करता येईल. जी गेल्या काही वर्षांपासून चांगली नाही, कारण तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदामुळे तो दडपणाखाली होता. जे झाले ते चांगलेच झाले. रोहित शर्मा आणि विराट कोहली मिळून भारतीय क्रिकेटला पुढे नेऊ शकतात. असा विश्वासही त्याने यावेळी व्यक्त केला.

कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताचा विक्रम

एकदिवसीय सामन्यांमध्ये कोहलीने 95 सामन्यांचे नेतृत्व केले ज्यात भारताने 65 सामने जिंकले, याशिवाय 27 सामन्यांमध्ये भारताला त्याच्या नेतृत्वाखाली पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघ आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसह रोहित शर्मा एकदिवसीय कर्णधार म्हणून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. गुरुवारी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या प्रकरणावर मौन सोडले आणि म्हटले की, दोन वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी दोन कर्णधार असू शकत नाहीत.

First published:
top videos

    Tags: BCCI, Rohit sharma, Virat kohli