पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही? विराटने दिली पहिली प्रतिक्रिया

पाकिस्तानविरुद्ध खेळायचे की नाही? विराटने दिली पहिली प्रतिक्रिया

पुलवामा हल्ल्यानंतर देशापेक्षा खेळ मोठा नाही असं म्हणत अनेकांनी पाकिस्तानविरुद्ध भारताने खेळू नये असं म्हटलं आहे.

  • Share this:

विशाखापट्टणम, 23 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात पाकिस्तान विरोधात संतापाची लाट उसळली आहे. यातच भारताच्या क्रिकेट संघाने आगामी विश्वचषकात पाकविरुद्ध खेळू नये अशी चर्चा होत आहे. बीसीसीआयने याबाबत केंद्र सरकारने आम्हाला खेळावे की नको ते सांगावे असं म्हटलं आहे.

दरम्यान विराट कोहलीने यावर विचारलेल्या प्रश्नावर आम्ही देशासोबत आहे आणि बीसीसीआय जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असं म्हटलं आहे. सध्या विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी सराव करत आहे. सध्या भारतीय संघ विशाखापट्टणम येथे सराव करत असून महेंद्रसिंग धोनीही याठिकाणी आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाड़ू हैदराबादमध्ये सराव करत आहेत.

पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकविरु्दध वर्ल्डकपमध्ये खेळू नये अशी मागणीवर भारताच्या खेळाडूंसह अनेकांनी प्रतिक्रिया दिली होती. विराट कोहलीने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नव्हती. त्याने एका पत्रकार परिषदेत आपण शहीद कुटुंबीयांसोबत असून देश जे म्हणेल ते करु असे सांगितले. आमचं मत काय असं विचारलं तर त्याचं उत्तर सरळ आहे. देशाला आणि बीसीसीआयला जर पाकिस्तान विरुद्ध खेळू नये असं वाटलं तर आम्ही तेच करु असं कोहली म्हणाला.

शुक्रवारी झालेल्या बैठकीत कोणताही निर्णय होऊ सकला नाही. यात सरकारसोबत चर्चा करण्याच्या निर्णयावर सगळं येऊन थांबलं आहे. बीसीसीआयने आयसीसीला लिहलेल्या पत्रात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात 44 जवान शहीद झाल्याचे सांगत वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळण्याबाबत आणि त्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने सामना रद्द करून पाकिस्तानला दोन गुण देणं अजिबात आवडणार नसल्याचं म्हटलं आहे. मात्र माझं प्राधान्य माझ्या देशाला आहे. माझा देश जो निर्णय घेईल, मी त्याला मनापासून पाठिंबा देईन असं सचिन म्हणाला. दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरुर यांनी पाकिस्तानविरुद्ध न खेळणं म्हणजे लढण्याआधीच शरणागती पत्करल्यासारखं होईल असं म्हटलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 23, 2019 12:50 PM IST

ताज्या बातम्या