मुंबई, 26 नोव्हेंबर: टी20 वर्ल्ड कपनंतर सध्या टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज विराट कोहली सध्या ब्रेकवर आहे. याचदरम्यान विराटनं इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली होती. या व्हिडीओत दिसणारी व्यक्ती म्हणजे विराट कोहली असं अनेकाना वाटू शकतं. पण तो विराट नाही तर विराटचा डुप्लीकेट होता. मुंबईतल्या लिंकिंग रोड भागात विराटचा हा डुप्लीकेट प्युमा या ब्रँडचे कपडे आणि फुटवेअर विकत होता. यावर विराटनं आक्षेप घेत प्युमाकडे याची तक्रार केली आहे.
विराटची प्युमाकडे तक्रार
विराट कोहलीनं हा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत म्हटलं होतं, 'माझ्यासारखी दिसणारी कोणीतरी व्यक्ती मुंबईतल्या लिंकिंग रोडवर प्युमाचे प्रॉडक्ट विकत आहे. प्युमा इंडिया, तुम्ही या प्रकरणात लक्ष द्याल का? प्युमा प्रॉडक्ट विकणारी ही व्यक्ती खरंच विराटसारखी दिसत आहे. त्यानं टीम इंडियाची जर्सीही घातली आहे. इतकच नव्हे तर लोक त्याच्यासोबत सेल्फीही घेत आहेत. दरम्यान हे प्रकरण कोहलीनं जास्त गांभीर्यानं घेतलेलं नाही. कारण याच्यामागे एक वेगळं कारणंही आहे.
Someone is impersonating Virat Kohli and selling Puma products 🙊 📷 VK Insta @imVkohli pic.twitter.com/BtqdD0JEIn
— Karamdeep 🎥📱 (@oyeekd) November 25, 2022
हेही वाचा - FIFA WC 2022: रोनाल्डोच्या आयुष्याचे 5 नियम... म्हणून दारु, सिगरेट आणि टॅटूपासून दूर आहे हा स्टार फुटबॉलर!
मार्केटिंग स्ट्रॅटेजी
खरं तर ही एक मार्केट स्ट्रॅटेजी होती. प्युमा या जर्मन स्पोर्टस ब्रँडनं प्रचारासाठी हा स्टंट केला होता. मिळालेल्या माहितीनुसार प्युमाने आपल्या सगळ्या ब्रँड अँबेसेडर्सच्या डुप्लीकेट्सना दिल्ली, मुंबई आणि गुरुग्राममधल्या स्टोअर्सवर प्रॉडक्टच्या जाहिरातीसाठी ठेवलं होतं. त्यात विराटसह सुनील छेत्री, करीना कपूर आणि युवराज सिंग यांचा समावेश होता. पण सोशल मीडियात मात्र विराटच्या डुप्लीकेटची चांगलीच चर्चा रंगली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sports, Team india, Virat kohli