Home /News /sport /

शेम टू शेम! IND VS AUS टी-20 सामना पाहायला आला विराटचा डुप्लिकेट, चाहतेही अवाक

शेम टू शेम! IND VS AUS टी-20 सामना पाहायला आला विराटचा डुप्लिकेट, चाहतेही अवाक

या सामन्यादरम्यान एका कॅमेरामनने स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या एका फॅनला कॅमेऱ्यात टिपलं. त्या फॅनकडे पाहून क्षणभर सगळेच स्तब्ध झाले कारण तो चक्क हुबेहूब भारताच्या कर्णधारासारखा दिसत होता

    सिडनी, 09 डिसेंबर: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 क्रिकेट सामन्यात मंगळवारी क्रिकेटप्रेमी काहीसे आश्चर्यचकित झाले होते. यावेळी स्टेडियममध्ये त्यांनी दोन-दोन विराट पाहायला मिळाले. मंगळवारी 8 डिसेंबरला सिडनी क्रिकेट मैदानात भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा टी-20 सामना पाहायला भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्यासारखा हुबेहूब दिसणारा एक फॅन उपस्थित होता. तो इतका विराटसारखा दिसत होता की त्याला पाहून स्टेडियममध्ये सामना पाहणारे प्रेक्षक, स्वत: विराट, मैदानातले इतर खेळाडू, कॉमेंट्रेटर आणि टीव्हीवरून हा सामना पाहणारे प्रेक्षक सगळेच आश्चर्यचकित झाले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी केली. सलामीवीर मॅथ्यु वेडने ( Matthew Wade) 53 बॉलमध्ये 80 धावा केल्या तर ग्लेन मॅक्सवेलने 36 बॉलमध्ये 54 धावा केल्या ज्यामुळे ऑस्ट्रेलियाला 20 ओव्हरमध्ये 5 बाद 186 धावा करता आल्या. सातव्या ओव्हरच्या आसपास भारतीय खेळाडूंनी कॅच सोडल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज वेड आणि स्टीव्ह स्मिथ यांना जीवदान मिळालं. (हे वाचा-IND vs AUS : '...तर हार्दिक पांड्या टेस्ट खेळेल', विराट कोहलीचं स्पष्टीकरण) इतक्यात या सामन्यादरम्यान एका कॅमेरामनने स्टेडियममध्ये भारतीय संघाच्या एका फॅनला कॅमेऱ्यात टिपलं. त्या फॅनकडे पाहून क्षणभर सगळेच स्तब्ध झाले कारण तो चक्क हुबेहूब भारताच्या कर्णधारासारखा, विराट कोहलीसारखा दिसत होता. त्यानेही विराटसारखीच दाढी वाढवली होती आणि डोळ्यांवर गॉगल लावला होता. त्यानेही भारताची जर्सी घातली होती त्यामुळे तर अगदीच विराट वाटत होता. कॅमेरामनने या फॅनवरून थेट कॅमेरा मैदानात खेळणाऱ्या विराट कोहलीकडे पॅन केला त्यामुळे तर सगळ्यांना त्यांच्यातलं साम्य पाहता आलं आणि हा क्षण आणखीनच गंमतशीर झाला. कॉमेंट्रेटरनीही याची दखल घेतली. यानंतर नेटिझन्सनी देखील विविध पोस्ट शेअर केल्या आहेत. विराटचा मैदानातला फोटो आणि त्या फॅनचा फोटो यांचे मिम्स तयार करून जबरदस्त व्हायरल देखील झाले आहेत. त्यावर अजब प्रतिक्रियाही येत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला कोरोना विषाणू लॉकडाऊन काळात पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरने तुर्की टीव्ही मालिका Diriliş: Ertuğrul मधला कलाकार Cavit Çetin Güner याचा फोटो ट्विट केला होता. विराट आणि हा अभिनेता या दोघांच्या दिसण्यात खूप साम्य आहे असं आमीरनं म्हटलं होतं. विराटच्या या फोटोंवर त्याच्या जगभरातील चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Virat kohali

    पुढील बातम्या