'चिकू तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा', विराटने स्वत:लाच लिहिलं पत्र

भारताचा कर्णधार विराट कोहली आज त्याचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसानिमित्त त्याने 15 वर्षीय विराटला पत्र लिहिलं आहे.

  • Share this:

मुंबई, 05 नोव्हेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहली त्याचा 31 वा जन्मदिन साजरा करत आहे. सध्या विराट पत्नी अनुष्कासोबत भूटानमध्ये आहे. वाढदिवसानिमित्त विराटने स्वत:लाच शुभेच्छा देणारं एक पत्र लिहलं आहे. त्यानं हे पत्र 15 वर्षीय विराटला लिहलं आहे. विराटने पत्रात म्हटलं की, सर्वात आधी चिकूला वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा. मला माहिती आहे की तुझ्या भविष्याबद्दल खूप सारे प्रश्न तुझ्याकडे आहेत. पण माझ्याकडे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं नाहीत. मला नाही माहिती की तुला काय सरप्राइज मिळेल आणि कोणती आव्हाने तुझ्यासमोर असतील. हे सर्व खूपच रोमांचक असेल. तुला हे आता नाही समजणार असं विराटने म्हटलं आहे.

टीम इंडिया आता बांगलादेश विरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. या मालिकेतून विराटने विश्रांती घेतली आहे. सध्या तो पत्नी अनुष्कासोबत भूटानमध्ये सुट्टी साजरी करत आहे. अनुष्कारनेसुद्धा विराटला शुभेच्छा देत काही फोटो शेअर केले आहेत. क्रिकेटमधील दिग्गजांनी विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.

हरभजन सिंगने विराटला शुभेच्छा देताना एक फोटो शेअर केला आहे. त्याने म्हटलं आहे की, सध्याच्या पिढीत फलंदाजीतला मास्टर आणि माझा लहान भाऊ विराट कोहलीला वाढदिवसाच्या शुभेच्छा. मी तुझ्या यशासाठी प्रार्थना करतो. तु आनंदी आणि निरोग रहा हीच प्रार्थना.

अनुष्काने विराटसोबतचे काही फोटो शेअऱ करताना भूटानमध्ये आलेला अनुभव सांगितला आहे.

भूटानमध्ये फिरत असताना तिथल्या गावात काही वेळ घालवला. तेव्हा एका कुटुंबाने केलेल्या पाहुणचाराने दोघेही भारावून गेले. त्याचा अनुभव अनुष्काने ट्विटरवर शेअर केला आहे.

लहानपणी वडिलांच्या स्कूटरवरून फिरायचा विराट, आता ताफ्यात आहेत कोटींच्या कार!

गडकरी-फडणवीस आमच्यासाठी एकच, संजय राऊतांच्या विधानाचा अर्थ काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 5, 2019 12:37 PM IST

ताज्या बातम्या