...म्हणून मोदींच्या आवाहनानंतरही विराट कोहली करणार नाही मतदान

...म्हणून मोदींच्या आवाहनानंतरही विराट कोहली करणार नाही मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्चला विराट कोहलीला मतदान करण्याचे आवाहन केले होते.

  • Share this:

मुंबई, 28 एप्रिल : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. सोमवारी मुंबई, ठाणेसह इतर ठिकाणी मतदानाचा चौथा टप्पा पार पडणार आहे, दरम्यान, लोकांनी घराबाहेर पडून मतदान करावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अभिनेते, खेळाडू सर्वच लोकांना आवाहन करत आहेत. मात्र, पंतप्रधानांनी आवाहन करुनही भारतीय क्रिकेट संघाचा स्टार कर्णधार मतदान करु शकणार नाही आहे.

पंतप्रधानांनी ट्विटरच्या माध्यमातून नेते, अभिनेते आणि खेळाडू यांना मतदान करण्याचे आवाहन केले होते. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याच्याही नावाचा समावेश होता. मात्र, विराट यावर्षी मतदान करू शकणार नाही आहे. याच कारण म्हणजे, विराट कोहलीनं आपल्या मुंबईच्या पत्त्यावर मतदान कार्ड बनवण्याचा प्रयत्न केला होता, त्यासाठी अर्जही केला होता. मात्र, मतदार यादीत त्याच्या नावाचा उल्लेखही नाही आहे.

निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विराटच्या टीमनं अनेक वेळा फोनकरुन नाव नोंदवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मतदार यादीत नाव नोंदवण्याची वेळ निघून गेल्यामुळं विराटच्या नावाचा समावेश मतदात यादीत होऊ शकला नाही. त्यामुळं विराट कोहली या लोकसभा निवडणुकीत मतदान करू शकत नाही.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्चला विराट कोहलीला मतदान करण्याचे आवाहन केले होते. मतदान अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च होती. विराटने 7 एप्रिलला मतदानासाठी अर्ज केला होता. दरम्यान विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा मुंबईतून मतदान करणार आहे.

वाचा अन्य बातम्या

केवळ 10 हजार रुपयांमध्ये फिरुन या गोवा, जाणून घ्या ही भन्नाट ऑफर

VIDEO : भाजपला निवडून द्या, असं म्हणत गडकरी बाजूला झाले आणि आली भोवळ

First Published: Apr 28, 2019 07:51 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading