‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

‘सचिनचे सर्व रेकॉर्ड विराट मोडेल पण…’ सेहवागचे कॅप्टन कोहलीला चॅलेंज

सेहवागनं कोहलीला दिले सचिन तेंडुलकरचा एक रेकॉर्ड मोडण्याचे आव्हान

  • Share this:

नवी दिल्ली, 22 ऑगस्ट : विराट कोहली आणि सचिन तेंडुलकर यांची तुलना नेहमीच होत असते. क्रिकेटमध्ये सर्वाधिक रेकॉर्ड हे महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत, मात्र त्याचे विक्रम विराट मागे टाकत आहे. सध्या क्रिकेटविश्वात विराट आणि सचिन असे दोन खेळाडू आहेत, ज्यांनी क्रिकेटमध्ये अधिराज्य गाजवले आहे. मात्र, भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागनं विराट कोहली सचिनचे सर्व रेकॉर्ड तोडणार, अशी हमी देत. एक रेकॉर्ड मात्र त्याला कधीच तोडता येणार नाही, असे म्हणत त्याला आव्हानही दिले आहे.

सेहवागनं एका वेबसाईटला दिलेल्या माहितीनुसार, “सध्याच्या काळात विराट कोहली हा सर्वात चांगला फलंदाज आहे. त्याचा फॉर्म बघता, त्याच्या तोडीचा कोणीही फलंदाज नाही. ज्या पध्दतीनं तो शतक करतो, धावा करत आहे, तो बेस्टचं आहे. विराटनं सचिन तेंडुलकरचे सर्वात जास्त रेकॉर्ड तोडू शकतो. मात्र, सचिनचा एक रेकॉर्ड मोडणे कोणालाच जमणार नाही. तो म्हणजे 200 कसोटी सामने खेळण्याचा. मला नाही वाटतं कोणता फलंदाज यापुढे 200 कसोटी सामने खेळेल”, असे सांगितले.

वनडेमध्ये विराटनं तोडले सचिनचे रेकॉर्ड

विराट कोहलीच्या नावावर 43 एकदिवसीय शतक आहे. त्यामुळं सचिनचा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ 7 शतकांची गरज आहे. सचिनच्या नावावर 463 एकदिवसीय सामन्यात 49 शतक लगावले आहेत. संपूर्ण करिअरमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 44.83च्या सरासरीनं धावा केल्या आहेत. तर, कोहलीनं 239 एकदिवसीय सामन्यात 60.31च्या सरासरीनं धावा केल्या.

वाचा-फॉरेनचा जावई! हसन अलीनंतर 'हा' ऑस्ट्रेलियन क्रिकेटर करणार भारतीय मुलीशी लग्न

कसोटी क्रिकेटमध्येही विराटचा दबदबा

कसोटी क्रिकेटमध्ये विराटनं 77 सामन्यात 25 शतक लगावले आहेत. सचिन तेंडुलकरनं 329 कसोटी सामन्यात 51 शतक झळकावले आहेत. त्यामुळं विराटनं कमी सामन्यात चांगली कामगिरी केली असली तरी, 200 कसोटी सामन्यांचा टप्पा पर करणे कठिण आहे.

वाचा-धोनीच्या ‘त्या’ एका निर्णयावर भडकला सेहवाग, म्हणाला...

स्टिव्ह स्मिथपेक्षा विराटचं बेस्ट

अशेस स्पर्धेत फॉर्ममध्ये असलेला स्टीव्ह स्मिथहा विराटपेक्षा बेस्ट असल्याचे मत सर्व चाहते व्यक्त करत असताना विरेंद्र सेहवागनं मात्र वेगळे मत व्यक्त केले आहे. सेहवागच्या मते, कसोटी क्रिकेटमध्ये विराटनं केलेली कामगिरी जास्त दर्शनीय आहे.

वाचा-अखेर भांडण मिटलं! विराटनं शेअर केला पण नेटकऱ्यांनी रोहितला केलं ट्रोल

राज ठाकरे ईडी चौकशीसाठी घराबाहेर पडतानाचा EXCLUSIVE VIDEO

Published by: Renuka Dhaybar
First published: August 22, 2019, 11:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading