Home /News /sport /

T20 World Cup साठी टीम इंडियात या तिघांनी ठोकला दावा, विराटचं टेन्शन वाढणार!

T20 World Cup साठी टीम इंडियात या तिघांनी ठोकला दावा, विराटचं टेन्शन वाढणार!

मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताचं आव्हान लीग स्टेजमध्येच संपुष्टात आलं.

    मुंबई, 20 जून : मागच्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) कामगिरी निराशाजनक झाली होती. पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यामुळे भारताचं आव्हान लीग स्टेजमध्येच संपुष्टात आलं. यावेळी मात्र भूतकाळ विसरून चांगली कामगिरी करण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असणार आहे, यासाठी टीमचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड तयारी करत आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 वर्ल्ड कप होणार आहे. टी-20 वर्ल्ड कपआधी होणाऱ्या सगळ्या सामन्यांवर टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीचं लक्ष असेल, कारण या कामगिरीच्या जोरावरच खेळाडूंची टी-20 वर्ल्ड कपसाठीच्या टीममध्ये निवड होईल, त्यामुळे युवा खेळाडू टीममधलं त्यांचं स्थान पक्कं करण्यासाठी आग्रही असतील. टीम इंडियासाठी सगळ्यात मोठा चिंतेचा विषय म्हणजे विराट कोहलीचा (Virat Kohli) फॉर्म आहे. बऱ्याच काळापासून विराट फॉर्ममध्ये नाही, तसंच टी-20 मध्येही त्याची कामगिरी खास झालेली नाही. इंग्लंड दौऱ्यावर लक्ष टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यात एकूण 7 मॅच खेळणार आहे. यात 1 टेस्ट, 3 टी-20 आणि 3 वनडे मॅचचा समावेश आहे. 1 जुलैपासून टीम इंग्लंडमध्ये टेस्ट खेळणार आहे. इंग्लंडविरुद्धची टी-20 आणि वनडे सीरिज आता टीम इंडियासाठी महत्त्वाची आहे, कारण या दोन्ही सीरिजना टीम इंडियाची वर्ल्ड कपसाठीची तयारी म्हणून बघितलं जात आहे. विराट कोहलीने नोव्हेंबर 2019 साली शेवटचं शतक झळकावलं होतं. यानंतर कोहलीची बॅट शांत झाली. आयपीएलमध्येही तो खास काही करू शकला नाही. विराट कोहलीचा फॉर्म टीम मॅनेजमेंटसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. जर कोहलीला इंग्लंड दौऱ्यातही चांगली कामगिरी करता आली नाही, तर निवड समिती युवा खेळाडूंवर विश्वास दाखवणार का? असा प्रश्न आहे. आयर्लंड दौऱ्यासाठी राहुल त्रिपाठीची टीम इंडियात निवड झाली आहे. आयपीएलमध्ये राहुल त्रिपाठीने (Rahul Tripathi) धमाका केला होता. याशिवाय दीपक हुड्डानेही (Deepak Hooda) आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरिजमध्ये इशान किशनने (Ishan Kishan) 200 पेक्षा जास्त रन केल्या. कोहलीने भारतासाठी 97 टी-20 सामन्यांच्या 89 इनिंगमध्ये 51.5 च्या सरासरीने 3,296 रन केल्या आहेत. आयपीएलमधल्या चांगल्या कामगिरीनंतर अनेक युवा खेळाडू टीम इंडियाचा दरवाजा ठोठावत आहेत, त्यामुळे विराट कोहलीवर चांगल्या कामगिरीसाठी दबाव वाढू शकतो.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: T20 world cup, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या