'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये विराट कॅप्टन झाला ट्रोल, पाहा VIRAL VIDEO

विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं एकही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 07:18 PM IST

'तारक मेहता का उल्टा चश्मा'मध्ये विराट कॅप्टन झाला ट्रोल, पाहा VIRAL VIDEO

मुंबई, 30 सप्टेंबर : विराट कोहली (Virat Kohli) जेव्हापासून भारतीय संघाचा कर्णधार झाला आहे, तेव्हापासून टीम इंडियानं चांगली कामगिरी केली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं ‘विराट’ कामगिरी केली आहे. मात्र हे तेवढेच खरे आहे की, विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं एकही आयसीसीची स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळं विराचट कोहली यशस्वी कर्णधार आहे, असे म्हटले जाऊ शकत नाही. दरम्यान सोशल मीडियावर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणानं ट्रोल होणारा विराट आता चक्क हिंदी कार्यक्रमात ट्रोल झाला आहे.

तारक मेहतामध्ये ट्रोल झाला विराट

'तारक मेहता का उल्टा चश्मा' या कार्यक्रमात विराट कोहलीला मस्करी-मस्करीमध्ये ट्रोल झाला आहे. या कार्यक्रमाच्या एका भागात सोनू आपले बाबा मास्टर भिडे यांना नेहमी जिंकणारा कोण, असा सवाल केला. त्यावर भिडेनं विराट कोहली असे सांगितले. यावर सोनूनं, “विराट कोहली कसा असेल तो 2019मध्ये झालेल्या वर्ल्ड कपमध्ये हरला आहे”, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडकडून मिळाला होता पराभव

Loading...

आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019मध्ये भारतीय संघानं शानदार कामगिरी केली. मात्र सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरोधात सुमार फलंदाजीमुळं भारताला पराभवाचा धक्का बसला. याआधी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला 2017मध्ये चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला होता.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार आहे विराट

एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही आहे. असे असले तरी, कसोटी क्रिकेटमध्ये विराट सर्वात यशस्वी कर्णधार आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारित पहिल्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर विराट कोहली सर्वात जास्त कसोटी सामना जिंकणारा कर्णधार झाला आहे. भारतीय संघ आता 2 ऑक्टोबरपासून दक्षिण आफ्रिकाविरोधात कसोटी सामना खेळणार आहे.

VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 30, 2019 07:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...