मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

IND vs ENG : वर्क आऊटच्या VIDEO मुळे विराट 'बेक्कार' ट्रोल, चाहते म्हणाले...

IND vs ENG : वर्क आऊटच्या VIDEO मुळे विराट 'बेक्कार' ट्रोल, चाहते म्हणाले...

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतो. फिट राहण्यासाठी विराट कायमच जीममध्ये जाऊन कठोर वर्कआऊट करतो.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 8 जुलै : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) त्याच्या फिटनेसमुळे कायमच चर्चेत असतो. फिट राहण्यासाठी विराट कायमच जीममध्ये जाऊन कठोर वर्कआऊट करतो. कोहलीच्या नावावर क्रिकेटमध्ये अनेक रेकॉर्ड आहेत, पण सध्या तो खराब फॉर्ममधून जात आहे. तसंच वारंवार आयसीसी स्पर्धा जिंकण्यात अपयश येत असल्यामुळे चाहतेही विराट कोहलीवर नाराज आहेत. काहीच दिवसांपूर्वी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (World Test Championship Final) न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता.

फायनलमधल्या या पराभवाच्या या धक्क्यानंतर टीम इंडिया सावरली आहे. आता भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या 5 टेस्ट मॅचच्या सीरिजला 4 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजआधीही विराट जिममध्ये घाम गाळत आहे. याचा व्हिडिओ विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर टाकला आहे, पण विराटच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी निशाणा साधला आहे.

कर्णधार विराट कोहलीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोन व्हिडिओ शेयर केले. या व्हिडिओमध्ये विराट मोठी वजनं उचलत आहे. काहींनी विराटच्या या व्हिडिओचं कौतुक केलं, तर अनेकांनी फायनलमधल्या पराभवावरुन विराटवर निशाणा साधला.

View this post on Instagram

A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

शतक करता येत नसेल, तर वर्कआऊट करण्याचा उद्देश काय? क्रिकेटसोडून वेटलिफ्टिंगमध्ये भारताला गोल्ड मेडल जिंकवून दे. फक्त वजनच उचलतोस का? कधीतरी कपही उचल, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया विराटच्या या व्हिडिओवर आल्या आहेत.

32 वर्षांच्या विराट कोहलीला मागच्या दोन वर्षांमध्ये एकही शतक करता आलेलं नाही. याआधी 2015 सालच्या वर्ल्ड कपमध्ये विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्माला टीमच्या पराभवानंतर ट्रोल करण्यात आलं होतं.

First published:

Tags: Virat kohli