नव्या वाहतूक नियमांचा विराटला फटका, PHOTO शेअर करताच...

नव्या वाहतूक नियमांचा विराटला फटका, PHOTO शेअर करताच...

देशात सध्या वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास मोठ्या रकमेचा दंड आकारण्यास सुरुवात झाली आहे. यावेळी विराटनं एक फोटो शेअर केल्यानं त्याला ट्रोल केलं जात आहे.

  • Share this:

मुंबई, 06 सप्टेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं गुरुवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक फोटो शेअर केला आहे. यानंतर त्याला नेटकऱ्यांनी ट्रोल केलं आहे. विराटनं शेअर केलेल्या फोटोत तो फक्त स्विम विअर शॉर्ट्स घालून बसला आहे. एका अंधार असलेल्या जागी बसलेला दिसत आहे.

विराटनं फोटो शेअर करताना लिहलं आहे की, जोपर्यंत आपण स्वत:च्या आतमध्ये झाकून बघत नाही तोपर्यंत आपल्याला बाहेर पाहण्याची गरज नाही. विराटनं हा फोटो शेअर करताच तो ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. खरंतर त्याच्या कामगिरीमुळं नाही तर सध्या देशात वाहतूकीच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळं होणाऱ्या दंडामुळं त्याला ट्रोल केलं जातं आहे.

वाहतुकीचा एखादा नियम मोडला तरी मोठ्या रकमेचा दंड भरावा लागत आहे. नव्या दंडाच्या रकमेवरून अनेक मीम्स व्हायरल होत आहे.

त्यातच विराटनं शर्टलेस फोटो शेअऱ केल्यानंतर दंड भरल्यामुळं अशी वेळ आली असल्याचंही चाहत्यांनी म्हटलं आहे.

एका युजरनं तर कर्णधार विराट कोहलीला विचारलं आहे की, ही काय अवस्था करून घेतली. बायकोशी भांडण झालं की पावती पाडली. जे झालं ते झालं आता कपडे घाल.

नुकताच भारताचा विंडीज दौऱा झाला. यामध्ये भारतानं विराटच्या नेतृत्वाखाली टी20, एकदिवसीय आणि कसोटी मालिका जिंकल्या. आता दक्षिण आफ्रिका संघ भारत दौऱ्यावर येणार आहे.

VIDEO: ट्रॅफिक पोलिसांनी पावती फाडताच तरुणाने पेटवली बाईक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2019 12:10 PM IST

ताज्या बातम्या