पुन्हा वाद चिघळला, रोहितमुळे विराटनं पत्रकार परिषद घेण्यास दिला नकार!

पुन्हा वाद चिघळला, रोहितमुळे विराटनं पत्रकार परिषद घेण्यास दिला नकार!

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट भारतीय संघात असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 28 जुलै : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उप-कर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत आहे. वर्ल्ड कप 2019मध्ये भारताच्या पराभवानंतर रोहित आणि विराट यांच्यात वादाला सुरुवात झाली होती. यातच भारतीय संघात गटबाजी होत असल्याचेही समोर आले होते. आता या वादात भर पडली आहे.

भारतीय संघाच्या वेस्ट इंडिज दौऱ्याला 3 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. मात्र भारतीय संघाच्या दौऱ्याआधी होणारी पत्रकार परिषद यंदा होणार नाही असल्याचे माहिती मिळत आहे. याचे कारण विराट आणि रोहित यांच्यातील वाद असल्याचे बोलले जात आहे. पत्रकार परिषदेत, कोहलीला रोहितबाबत प्रश्न विचारले जातील या कारणामुळं विराट पत्रकारांशी संवाद साधणार नाही आहे.

सोमवारी भारतीय संघ या दौऱ्याच्या पहिल्या दोन टी-20 सामन्यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे. त्याआधी होणाऱ्या पत्रकार परिषदेला कर्णधार विराट उपस्थित राहणार नाही आहे. इंडिया टुडेनं दिलेल्या वृत्तानुसार, कोहली पत्रकार परिषदेत सामिल न होण्याचे कारण रोहित शर्मा असू शकतो. दरम्यान, या पत्रकार परिषदेला कर्णधार आणि प्रशिक्षक यांनी उपस्थित राहणे अपेक्षित असते. मात्र विराट शिवाय केवळ रवी शास्त्री पत्रकार परिषद घेऊ शकतात.

वाचा- आता कबड्डीच्या मैदानात दिसणार टीम इंडिया, विराटनं जाहीर केला संघ!

रोहित-विराट वाद पेटला

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. यावर बीसीसीआयचे प्रमुख विनोद राय यांनी, विराट-रोहितमध्ये कोणताच वाद नसल्याते मत व्यक्त केले आहे. राय यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना, "मीडियानं या बातम्या पसरवल्या आहेत. यात काहीच तथ्य नाही. भारतीय संघात कोणतीही गटबाजी नाही आहे", असे परखड मत व्यक्त केले होते.

वाचा- युवी इज बॅक! सिक्सर किंगनं केली पाक गोलंदाजाची धुलाई

रोहितनं केले अनुष्काला अनफॉलो

रोहित-विराट वर्ल्ड कपनंतर एकमेकांशी बोललेही नाही आहेत. दरम्यान आता रोहितनं विराटची पत्नी अनुष्का शर्माला इन्स्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. त्यामुळं आता या वादाला नवा रंग आला आहे.रोहितनं यापूर्वी कोहलीलाही अनफॉलो केले होते.पण, कोहली इंस्टाग्रामवर अजूनही रोहितला फॉलो करतो. पण, रोहितची पत्नी कोहलीच्या फ्रेंड लिस्टमध्ये अजूनही नाही.

वाचा- धवननं घेतली भाजप मंत्र्यांची भेट, चाहते विचारतात कधी करणार पक्षप्रवेश!

काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांचा बच्चेकंपनीसोबत डान्स, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 28, 2019 04:22 PM IST

ताज्या बातम्या