मुंबई, 14 डिसेंबर: भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील सिरिज 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. ही सीरिज सुरू होण्यापूर्वीच अनेक घडामोडी समोर येत आहेत. टीम इंडियामध्ये (Team India)सर्व काही अलबेल असल्याचे समजत आहे. कारण, दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी, विराट कोहलीने (Virat Kohli) मुंबईतील सराव सत्र वगळले त्यामुळे तो बीसीसीआयवर (BCCI)नाराज असल्याची चर्चा रंगला आहे. अशातच आता त्याने, होणाऱ्या वनडेतूनही माघार घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.
विराट कोहली दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार्या कसोटी संघाचा भाग आहे आणि तो त्याचा कर्णधार देखील आहे, परंतु त्याने आधीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) एकदिवसीय संघात खेळणार नसल्याचे सांगितले आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेपूर्वी, मर्यादित षटकांच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवण्याच्या बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या निर्णयानंतर संघामध्ये अनेक घडामोडी घडत आहेत.
मात्र, खुद्द विराट कोहलीने या प्रकरणावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे म्हटले जात आहे की दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका वगळण्याच्या त्याच्या निर्णयाचा कर्णधार बदलाशी काहीही संबंध नाही.
'टाइम्स ऑफ इंडिया'च्या वृत्तानुसार, विराटला त्याची मुलगी वामिकाचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी वेळ हवा आहे. गेल्या वर्षी 11 जानेवारीला वामिकाचा जन्म झाला. भारतीय कसोटी कर्णधार कसोटी मालिका संपल्यानंतर आपल्या कुटुंबासोबत सुट्टी घालवण्याचे नियोजन करत असल्याचे सांगितले जाते. या दौऱ्यातील अंतिम कसोटी 11 ते 15 जानेवारी दरम्यान खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिका 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
दक्षिण अफ्रिको दौऱ्यापूर्वी, टीम इंडियाने रविवारी मुंबईत एक छोटासा कॅम्प केला, ज्यामध्ये विराट कोहली अनुपस्थित होता. इतकेच नव्हे तर त्याला बीसीसीआय अधिकाऱ्यांना फोल केला मात्र, त्याने काही रिप्लाय दिला नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विराट कोहलीच्या जागी ओपनर रोहित शर्माला वनडे टीमचा नवा कर्णधार बनवल्यापासून विराट बीसीसीआयच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. याचे कारण म्हणजे तीन महिन्यांपूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने वनडे आणि कसोटीत कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु बीसीसीआयने त्याचे ऐकले नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Rohit sharma, Virat kohli, Virat kohli and anushka sharma