Elec-widget

IPL 2019 : विराटसाठी गुड न्यूज ! RCBचा हा खेळाडू म्हणतो, आम्ही प्ले-ऑफपर्यंत नक्की जाणार

IPL 2019 : विराटसाठी गुड न्यूज ! RCBचा हा खेळाडू म्हणतो, आम्ही प्ले-ऑफपर्यंत नक्की जाणार

एकीकडं आरसीबी आता प्ले-ऑफमध्ये पोहोचणार नाही असे सगळे म्हणत असताना, बंगळुरूचा हा खेळाडू म्हणतो...

  • Share this:

मोहाली, 13 एप्रिल : आयपीएलच्या अकरा हंगामात कधीच घडला नाही, असा प्रकार भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीवर आली. आयपीएलच्या बाराव्या हंगामात सलग सहा सामन्यात विराटला पराभव सहन करावा लागला.

त्यामुळं विराटचा हा दुष्काळ संपावा अशी अपेक्षा सगळेच चाहते करत असताना, विराटनं आपल्या चाहत्यांना एक गुड न्यूज दिली आहे. आज विराटचा संघ पंजाब विरोधात त्यांच्या घरच्या मैदानावर म्हणजे मोहालीवर आपला सातवा सामना खेळणार आहे. या सामन्यात कोहलीनं टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान पंजाबकडून सलामीला आलेल्या केएल राहुल आणि ख्रिस गेल यांनी तुफान फटकेबाजी केल्यानंतर अखेर 66 धावानंतर चहललं राहुलला बाद करण्यात यश आले. दरम्यान टॉस जिंकताना कोहलीनं आम्ही घाबरून खेळणार नाही, असे सांगितले होते.रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आतापर्यंत सलग सहा सामने गमावले आहेत. त्यामुळे आरसीबी आता प्ले-ऑफमध्ये पोहोचणार नाही, असे म्हटले जात आहे. पण आरसीबीच्या एका खेळाडूला अजूनही आपला संघ प्ले-ऑफमध्ये पोहोचू शकतो असा विश्वास आहे. या खेळाडूचे नाव आहे मोइन अली. बंगळुरूकडून खेळणाऱ्या या ऑलराऊंडरनं बंगळुरू संघ सगल सामने जिंकत प्ले ऑफमध्ये धडक मारु शकतो असा विश्वास व्यक्त केला.

Loading...

दरम्यान, बेंगळूरुची आयपीएलमधील कामगिरी कोणत्याही स्थितीत उंचावत नाही, हेच दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पराभवानंतर स्पष्ट झाले आहे. त्यामुळं या सामन्यात विराट कोहली विजयाचे दार खुले करण्याच्या प्रयत्नात असेल. दरम्यान, बाद फेरीचे आव्हान टिकवण्यासाठी बेंगळूरुला उर्वरित आठही सामने जिंकण्याची आवश्यकता आहे.VIDEO: निवडणूक चिन्हाचा असाही प्रचार; बॅटच्या आकारात केली पिकाची कापणी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 13, 2019 08:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...