विराटने त्याची डायरी भरमैदानात फाडली अन् तो बघतच राहिला, VIDEO VIRAL

विराटने त्याची डायरी भरमैदानात फाडली अन् तो बघतच राहिला, VIDEO VIRAL

विराटने भरमैदानात डायरी फाडण्याची स्टाइल केल्यानंतर बिग बींनीदेखील ट्विट करून विंडिजच्या खेळाडूंना आठवण करून दिली आहे.

  • Share this:

हैदराबाद, 07 डिसेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद 94 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजविरुद्धचा पहिला टी20 सामना 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात विराट कोहलीचा रुद्रावतार बघायला मिळाला. विराटने सुरुवातीला लोकेश राहु आणि त्यानंतर ऋषभ पंतसोबत भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, सामन्यात चर्चा झाली ती विराटने केलेल्या अॅक्शनची. विंडीजचा गोलंदाज केजरिक विल्यम्स आणि विराट कोहली यांच्यात वेगळाच सामना सुरू होता. विराटनं शेल्डन कॉट्रेलच्याही गोलंदाजीवर तुफान फटकेबाजी केली. त्यावेळी त्याच्याच स्टाइलनं सेलिब्रेशन करत प्रत्युत्तर दिलं.

वेस्ट इंडिजच्या खेळाडूंचे विकेट घेतल्यानंतर किंवा इतर वेळी केलं जाणारं सेलिब्रेशन प्रसिद्ध आहे. शेल्डन कॉट्रेल सॅल्यूट करतो तर केजरिक विल्यम्स हा विकेट मिळाल्यानंतर फलंदाजाचं नाव आपल्या डायरीत लिहण्याचा अभिनय करतो. विराटने विल्यम्सच्या या स्टाइलला प्रत्युत्तर देताना पाने फाडल्याचा अभिनय विराटनं केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बींनीसुद्धा यावर ट्विट करताना म्हटलं की, यार कितीवेळा सांगितलं की, विराटला छेडू नका, छेडू नका, छेडू नका.. पण तुम्ही ऐकता का.. आता दिलं ना लिहून हातात... बघ बघ वेस्ट इंडिजचे तोंड बघ... किती मारलं त्याला.

वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिल टी20 सामना भारताने 6 गडी राखून जिंकला. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीनं 50 चेंडूत केलेल्या 94 धावांच्या तुफान फटकेबाजीची चर्चा जोरात झाली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. विंडीजने 5 बाद 207 धावांचा डोंगर उभा केला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहलीने केलेल्या तुफान फटकेबाजीने विजय साजरा केला.

Published by: Suraj Yadav
First published: December 7, 2019, 9:12 AM IST
Tags: virat

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading