Home /News /sport /

Virat Captaincy : 'टीमसाठी बेईमान होऊ शकत नाही', कॅप्टन्सी सोडल्यावर काय म्हणाला विराट

Virat Captaincy : 'टीमसाठी बेईमान होऊ शकत नाही', कॅप्टन्सी सोडल्यावर काय म्हणाला विराट

विराट कोहलीने टी-20 पाठोपाठ आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीचाही राजीनामा (Virat Kohli Steps Down) दिला आहे. बीसीसीआयने विराटची वनडे टीमची कॅप्टन्सी आधीच काढून घेतली होती.

    मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने टी-20 पाठोपाठ आता टेस्ट टीमची कॅप्टन्सीचाही राजीनामा (Virat Kohli Steps Down) दिला आहे. बीसीसीआयने विराटची वनडे टीमची कॅप्टन्सी आधीच काढून घेतली होती. टेस्ट टीमचं नेतृत्व सोडल्यामुळे आता विराट टीम इंडियाचा कोणत्याच फॉरमॅटचा कॅप्टन राहणार नाही. विराट कोहलीने टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडताना एक मोठं ट्वीट लिहिलं आहे. काय म्हणाला विराट? 'भारतीय क्रिकेटला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी 7 वर्ष कठोर मेहनत अथक प्रयत्न केले. मी माझं काम पूर्ण इमानदारीने केलं. एकाठिकाणी येऊन प्रत्येकाला थांबावं लागतं. माझ्यासाठीही आता टेस्ट कॅप्टन म्हणून वेळ आली आहे. या प्रवासात अनेक चढ-उतार आले, पण माझ्या प्रयत्नांमध्ये आणि आत्मविश्वासात कधीच कमी आलेली नाही. मी नेहमीच 120 टक्के देण्यावर विश्वास ठेवतो. मला जर काही गोष्टी करणं जमत नसेल, तर मला जाणवतं की हे करणं योग्य नाही. मी माझ्या टीमसाठी कधीच बेईमानी करणार नाही,' असं विराट म्हणाला. धोनीला धन्यवाद 'मी बीसीसीआयला धन्यवाद देऊ इच्छितो, कारण त्यांनी एवढा जास्त काळ मला टीमचं नेतृत्व करण्याची संधी दिली. तसंच मला पहिल्या दिवसापासून साथ दिलेल्या टीमच्या सगळ्या सदस्यांचेही आभार. त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझी साथ सोडली नाही. तुम्ही सगळ्यांनी हा प्रवास कायम आठवणीत राहिल असा आणि सुंदर केलात,' असं विराटने त्याच्या ट्वीटमध्ये सांगितलं. 'रवी भाई आणि सपोर्ट ग्रुप या वाहनाचं इंजिन होते, ज्यांच्या मदतीमुळे टेस्ट क्रिकेटमध्ये आम्ही कायम वरच्या स्तरावर गेलो. एमएस धोनीला सगळ्यात जास्त धन्यवाद, ज्याने कर्णधार म्हणून माझ्यावर विश्वास दाखवला,' असं विराट म्हणाला. टीम इंडियात ऑल इज नॉट वेल! विराटच्या राजीनाम्याच्या 20 मिनिटांमध्येच BCCI म्हणालं Thank You! कोहली भारताचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात टीम इंडियाने 68 पैकी 40 टेस्ट जिंकल्या. यानंतर धोनीने 60 पैकी 27 टेस्ट जिंकल्या होत्या. नुकत्याच झालेल्या तीन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा 2-1 ने पराभव केला होता. सीरिजची दुसरी टेस्ट पाठीच्या दुखापतीमुळे विराट खेळू शकला नव्हता.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, Virat kohli

    पुढील बातम्या