Home /News /sport /

टीम इंडियात ऑल इज नॉट वेल! विराटच्या राजीनाम्याच्या 20 मिनिटांमध्येच BCCI म्हणालं Thank You!

टीम इंडियात ऑल इज नॉट वेल! विराटच्या राजीनाम्याच्या 20 मिनिटांमध्येच BCCI म्हणालं Thank You!

विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमचा (Virat Kohli Steps Down) तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतली टेस्ट सीरिज (India vs South Africa) 2-1 ने गमावल्याच्या 24 तासांमध्येच विराटने आपण टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडत असल्याची घोषणा केली आहे. विराटच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने (BCCI) 20 मिनिटांमध्येच प्रतिक्रिया दिली, त्यामुळे विराट आणि बीसीसीआय यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 15 जानेवारी : विराट कोहलीने भारताच्या टेस्ट टीमचा (Virat Kohli Steps Down) तडकाफडकी राजीनामा दिला आहे. दक्षिण आफ्रिकेतली टेस्ट सीरिज (India vs South Africa)  2-1 ने गमावल्याच्या 24 तासांमध्येच विराटने आपण टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडत असल्याची घोषणा केली आहे. त्याने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडत असल्याची सविस्तर पोस्ट लिहिली आहे. विराटच्या या निर्णयानंतर बीसीसीआयने (BCCI) 20 मिनिटांमध्येच प्रतिक्रिया दिली, त्यामुळे विराट आणि बीसीसीआय यांच्यात सारं काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. काय म्हणालं बीसीसीआय? विराटने टेस्ट टीमची कॅप्टन्सी सोडल्याचं ट्वीट केलं, यानंतर 20 मिनिटांमध्येच बीसीसीआयने हे ट्वीट रिट्विट केलं आणि विराटला धन्यवाद दिले. 'विराटच्या नेतृत्वात भारतीय टेस्ट टीम नव्या उंचीवर पोहोचली, याबाबत त्याचे अभिनंदन. विराटच्या नेतृत्वात भारताने 68 टेस्ट खेळल्या, यातल्या 40 टेस्टमध्ये भारताचा विजय झाला. विराट भारताचा सगळ्यात यशस्वी टेस्ट कर्णधार आहे,' असं बीसीसीआय त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणालं आहे. विराट-बीसीसीआयचा वाद गेल्या काही काळापासून भारतीय क्रिकेटमध्ये कॅप्टन्सीचा वाद सुरू आहे. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपआधी विराट कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडली, यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱ्याआदी त्याला वनडे टीमच्या कर्णधारपदावरूनही हटवण्यात आलं. यानंतर मोठा वाद निर्माण झाला. विराट कोहलीला आम्ही टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगितलं होतं, पण तो ऐकला नाही. यानंतर निवड समितीला मर्यादित ओव्हरच्या फॉरमॅटसाठी एकच कर्णधार हवा होता, त्यामुळे विराटची वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हकालपट्टी करण्यात आली, असं बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने सांगितलं. सौरव गांगुलीने केलेला हा दावा विराट कोहलीने फेटाळून लावला. मला टी-20 टीमची कॅप्टन्सी सोडू नको, असं सांगण्यात आलं नव्हतं, तसंच दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठीची टेस्ट टीम निवडण्याच्या दीड तास आधी मला तू आता वनडे टीमचा कर्णधारही असणार नाहीस, असं निवड समितीने सांगितल्याचा दावा विराट कोहलीने केला होता. विराट कोहली हा टीम इंडियाचा सगळ्यात यशस्वी कर्णधार आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने ऑस्ट्रेलियाचा ऑस्ट्रेलियात टेस्ट सीरिजमध्ये पराभव केला, तर इंग्लंडच्या जमिनीवर टेस्ट सीरिजमध्ये आघाडी घेतली. एमएस धोनीने 2014 साली टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर विराट कोहली भारताच्या टेस्ट टीमचा कर्णधार झाला.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: BCCI, Virat kohli

    पुढील बातम्या