Home /News /sport /

विराटने कॅप्टन्सी सोडली की हकालपट्टी? Inside Story चं दुसरं व्हर्जन आलं समोर

विराटने कॅप्टन्सी सोडली की हकालपट्टी? Inside Story चं दुसरं व्हर्जन आलं समोर

Virat Kohli

Virat Kohli

माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा (Chetan Sharma) यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीने बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा केली. त्याचवेळी वन-डे टीमचा नवा कॅप्टन म्हणून रोहितच्या नावाची घोषणा करण्यात आली.

    मुंबई, 9 डिसेंबर : भारताच्या एकदिवसीय क्रिकेट टीमचा (ODI Cricket New Captain) नवा कॅप्टन म्हणून रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावाची घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने बुधवारी (8 डिसेंबर) केली. विराट कोहलीने (Virat Kohli) टी-20 टीमचं कर्णधारपद सोडल्यानंतर जेमतेम तीन महिन्यांच्या आतच वन-डे टीमचं कर्णधारपदही त्याच्याकडून गेलं आहे. त्यामुळे विराट कोहलीने हे पद स्वतःहून सोडलं, की चांगली कामगिरी न केल्याने बीसीसीआयने त्याच्याकडून ही जबाबदारी काढून घेतली, याबद्दल उलटसुलट चर्चा होत आहे. 'नवभारत टाइम्स'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. माजी क्रिकेटपटू चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालच्या निवड समितीने बुधवारी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टेस्ट टीमची घोषणा केली. त्याच वेळी वन-डे टीमचा नवा कॅप्टन म्हणून रोहितच्या नावाची घोषणा करण्यात आली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्णधारपद सोडण्याचा निर्णय विराट कोहलीने स्वतःहून घेतला होता. बीसीसीआयने केवळ त्या निर्णयाची घोषणा केली. हेही वाचा : टीम इंडियाच्या ऑल राऊंडरने झळकावलं शतक, आफ्रिका दौऱ्यासाठी दावेदारी सादर या संदर्भातल्या घडामोडींची माहिती असलेल्या सूत्रांनी असं सांगितलं, की 'कॅप्टन्सीसाठी विराट कोहलीला बराच वेळ द्यावा लागत होता. त्यामुळे त्याला या ब्रेकची गरज होती. आता त्याला आपल्या बॅटिंगवर लक्ष केंद्रित करता येईल आणि ते त्याच्यासाठी सर्वांत महत्त्वपूर्ण ठरेल.' टी-20 आणि वन-डे या दोन्ही प्रकारातली कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय विराट कोहलीचा स्वतःचा आहे. बीसीसीआयने त्याचा निर्णय केवळ जाहीर केला. सध्या बाबर आझमनंतर वन-डे प्रकारातला जगातला दुसऱ्या क्रमांकाचा बॅट्समन असलेला विराट कोहली टेस्ट मॅचेसमधल्या जवळपास 25 खेळींमध्ये शतक करू शकलेला नाही. सध्या तो टॉप-5 मध्येही नाही. हेही वाचा : VIDEO : बेन स्टोक्सनं 30 बॉलमध्ये 14 वेळा टाकले NO BALL, अंपायरला दिसलेच नाहीत दरम्यान, रोहित शर्माने आपली उपयुक्तता सातत्यपूर्ण कामगिरीतून सिद्ध केली आहे, असंही सूत्रांनी सांगितलं. 'जेव्हा कामगिरीत सातत्य असतं, तेव्हा त्याचं इनाम कोणत्या ना कोणत्या रूपात मिळायलाच हवं. जोपर्यंत त्याची वेळ आली नव्हती, तोपर्यंत तो जसा आहे तसाच बॅट्समन म्हणून राहत होता. आता मात्र त्याच्याकडे नवी भूमिका आहे. त्यामुळे तो बरंच काही करण्यासाठी तयार असेल,' असं त्यांनी सांगितलं. रोहित शर्माने मुंबई इंडियन्स टीमसाठी पाच वेळा आयपीएल लीग जिंकून आपल्या योग्यता सिद्ध केली आहे. तसेच, एकदिवसीय मॅचेसमध्ये कोहलीसोबत उपकप्तान म्हणूनही त्याची कामगिरी चांगली आहे. टेस्ट मॅचेसमध्येही त्याची कामगिरी आकर्षक आहे. त्याचा समावेश टॉप-5 बॅट्समनमध्ये होतो. त्यामुळेच त्याला टेस्ट टीमचा उपकप्तान म्हणूनही नियुक्त करण्यात आलं आहे. लिमिटेड ओव्हर्सच्या क्रिकेटमध्ये टीमचं नेतृत्व रोहित शर्माच्या हाती देण्याची वेळ आली आहे. तो बऱ्याच काळापासून कॅप्टन इन वेटिंग आहे. टी-20 (T-20) आणि वन-डे या दोन्ही प्रकारांत रोहित शर्मा जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनपैकी एक आहे.
    First published:

    Tags: Cricket, Sports, Virat kohli

    पुढील बातम्या