Home /News /sport /

टीम इंडियामध्ये All Is Not Well; विराट कोहली अजून बायो बबलमध्ये झाला नाही दाखल

टीम इंडियामध्ये All Is Not Well; विराट कोहली अजून बायो बबलमध्ये झाला नाही दाखल

Virat Kohli

Virat Kohli

दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाने रविवारी मुंबईत एक छोटासा कॅम्प केला, ज्यामध्ये विराट कोहली (Virat Kohli)अनुपस्थित होता.

    मुंबई, 14 डिसेंबर: तीन सामन्यांच्या टेस्ट सीरिजसाठी टीम इंडिया बुधवारी, 16 डिसेंबर रोजी चार्टर फ्लाइटने दक्षिण आफ्रिकेला (India tour of South Africa) रवाना होणार आहेत. तत्पूर्वी, मुंबईत तीन दिवस संघातील खेळाडूंना बायो-बबलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, विराट कोहली(Virat Kohli) संघातील खेळाडूंमध्ये कुठेच दिसला नाही. त्यामुळे क्रिकेट जगतात विराट बीसीसीआयवर नाराज असल्याची चर्चा रंगली होती. दरम्यान, मंगळवारी तो भारतीय संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होणार असल्याची माहिती कोहलीने दिली आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका वेबसाइटला दिलेल्या माहितीनुसार, विराट कोहली वैयक्तिक कारणांमुळे तो एका दिवसानंतर संघाच्या बायो-बबलमध्ये सामील होणार आहे. टीम इंडियाने रविवारी मुंबईत एक छोटासा कॅम्प केला, ज्यामध्ये विराट कोहली अनुउपस्थित होता. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “विराट कोहलीला माहिती देण्यात आली होती. मात्र तो गैरहजर राहिला. आम्ही आशा करतो की तो उद्या सामील होईल. जोहान्सबर्गला जाण्यापूर्वी खेळाडू हॉटेलमध्ये बायो-बबलमध्ये राहतील. बायो-बबलमध्ये राहण्यासाठी कोहलीला फोन करण्यात आला का असा सवाल एका अधिकाऱ्याला करण्यात आला असता. ते म्हणाले, तो एक व्यावसायिक क्रिकेटर असून लवकरच संघात सामील होणार आहे. पण होय, त्याने कॉलला उत्तर दिले पाहिजे. विराट कोहलीच्या जागी ओपनर रोहित शर्माला वनडे टीमचा नवा कर्णधार बनवल्यापासून विराट बीसीसीआयच्या या निर्णयावर नाराज असल्याची चर्चा रंगली आहे.  याचे कारण म्हणजे तीन महिन्यांपूर्वी टी-20 संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विराटने वनडे आणि कसोटीत कर्णधारपद कायम ठेवण्याची इच्छा व्यक्त केली होती, परंतु बीसीसीआयने त्याचे ऐकले नाही. विराटच्या नाराजीच्या चर्चेसंदर्भात संघातील इतर खेळाडूंनाही सवाल करण्यात आला होता. यावर '''काय नाराज? रोहित आणि विराटमध्ये कोणतीही अडचण नाही. सर्व तर्क वितर्क लावले जात असून यामध्ये कोणतेही तथ्य नाही. दोघेही व्यावसायिक आहेत आणि एकमेकांबद्दल आदर आहे. विराट भाईचा टीममध्ये खूप आदर आहे. त्यांच्या सामील होण्याची वाट पाहत आहे.'' अशी प्रतिक्रीया खेळाडूंनी दिली. 'इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, "विराट सध्या होम क्वारंटाईनमध्ये आहे, त्यामुळे तो मंगळवारी टीम इंडियामध्ये सामील होईल." विराट, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे यांनी बीसीसीआयला होम क्वारंटाईनसाठी विनंती केली होती, त्याला बोर्डाने मान्यता दिली होती.
    Published by:Dhanshri Otari
    First published:

    Tags: Rohit sharma, Virat kohli

    पुढील बातम्या