नवी दिल्ली, 17 सप्टेंबर : वर्ल्ड कपनंतर भारताचा माजी कर्णधार धोनीच्या निवृत्तीची चर्चा सातत्यानं होत आहे. धोनीने निवृत्ती घेतलेली नाही आणि तो विंडीज, दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही खेळत नाही मग तो 2020 मध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी महत्त्वाचा कसा असा प्रश्नही उपस्थित होत आहे. दरम्यान अनेक दिग्गजांनी धोनीने त्याच्या भविष्याचा विचार करून निर्णय घ्यायला हवा. त्याबद्दल धोनीने कर्णधार विराट कोहली आणि निवड समितीशी चर्चा करायला हवं असं म्हटलं होतं.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने धोनीच्या भविष्याबद्दल विराट कोहली आणि निवड समितीनं निर्णय घ्यायला हवा असं म्हटलं पाहिजे. गांगुली म्हणाला की , त्याला माहिती नाही कि निवड समिती काय विचार करते, विराटचं म्हणणं काय आहे. मात्र, ते या प्रक्रियेतील महत्वाचे घटक आहेत त्यांना निर्णय घेऊदे.
विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिका दौऱा सुरू झाला आहे. पहिला टी20 सामना पावसामुळे वाया गेला. दुसरा सामना 18 सप्टेंबरला मोहालीत होणार आहे. माजी कर्णधार सौरव गांगुलीने भारतीय संघ टी20 मालिका जिंकेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
गांगुली म्हणाला की, टीम इंडिया विजयाचा दावेदार आहे. घरच्या मैदानावर भारताला हपवणं कठीण आहे. आतापर्यंत अनेक दिग्गजांनी धोनीनं स्वत: त्याच्या निवृत्तीचा निर्णय घ्यावा असं म्हटलं होतं. मात्र गांगुलीने वेगळं मत नोंदवलं आहे.
वर्ल़्ड कपमधील पराभवानंतर धोनी देशात परतल्यावर निवृत्ती घेईल असं म्हटलं जात होतं. मात्र, त्यानंतर धोनीने विंडीज दौऱ्यातून माघार घेत लष्करी प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो शूटिंगमध्ये व्यग्र आहे. विंडीज दौऱ्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धही त्याचं नाव संघात नसल्यानं अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.
भाजपमध्ये आल्यानंतर उदयनराजेंची 'कॉलर स्टाईल' बंद होणार? पाहा SPECIAL REPORT
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा