कोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट!

कोणाला हवा विराट, कोणाला हवा रोहित; भारतीय संघात पडली उभी फूट!

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 22 जुलै : ICC Cricket World Cupमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. दरम्यान आता भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. मात्र, या दौऱ्याआधीच भारताच्या ड्रेसिंग रूममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. गल्फ न्यूजनं दिलेल्या माहितीनुसार, भारतीय संघात गटबाजी होत असल्याचे समोर आले आहे. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यात दुरावा आला आहे.

वर्ल़्ड कपनंतर विराट आणि रोहित शर्मा असे दोन गट आहेत अशा चर्चा रंगल्या आहेत. यात पहिला गट हा कर्णधार विराट कोहलीचा गट असून दुसरा गट हा उप-कर्णधार रोहित शर्माचा गट आहे. कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री चर्चा न करता निर्णय घेतात, त्यामुळं संघाचे नुकसान होत आहे. त्यामुळं रोहितकडे संघाचे कर्णधारपद जाणार अशी चर्चा होती. मात्र निवड समितीनं विराटकडेच संघाचे कर्णधार पद दिले आहे.

रोहितनं केली होती विराटला हटवण्याची मागणी

गल्फ न्यूजनं प्रसिध्द केलेल्या बातमीनुसार, सेमीफायनलमध्ये भारताच्या पराभवाला विराट कोहलीचे जबाबदार असल्याचे मत रोहितनं व्यक्त केले होते. विराटच्या नेतृत्वाखाली भारतानं मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. त्यामुळे त्याला कर्णधारपदावरून हटवण्याची मागणी करण्यात रोहितनं केली होती.

अशी होती संघात गटबाजी

सुत्रांच्या माहितीनुसार क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांचा कर्णधार विराट कोहलीला पाठींबा आहे. त्यामुळेच आफ्रिका आणि इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत पराभव होऊनही विराटवर कारवाई करण्यात आली नव्हती, असा आरोप करण्यात आला होता.

म्हणून कोहलीनं नाही घेतली विश्रांती

आता वर्ल्ड कपदरम्यान कोहलीच्या विश्रांतीची चर्चा महिनाभर सुरू होती. मात्र अचानक असं काय झालं की त्यानं विश्रांती न घेता वेस्ट इंडीज दौऱ्यात खेळण्याचा निर्णय घेतला.दरम्यानच्या काळात वर्ल्ड कपमधील भारताच्या पराभवाने कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न विचारले जात होते. अशा परिस्थितीत जर विंडीज दौऱ्यावर विराट गेला नसता तर पुन्हा पुढच्या दौऱ्यावेळी रोहितच्या कामगिरीची चर्चा केली जाईल. तसेच कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्न उभे केले जात होते. अशावेळी कर्णधार म्हणून संघात पुनरागमन करणं कोहलीसमोर आव्हानात्मक ठरलं असतं म्हणूनच त्यानं वेस्ट इंडीज दौऱ्यावर विश्रांती घेतली नाही असं म्हटलं जात आहे.

वाचा- मुंबई इंडियन्सच्या 'या' चॅम्पियन खेळाडूला मिळालं टीम इंडियाचं तिकीट!

VIDEO : MTNL इमारतीत आग कशी लागली? बचावलेल्या कर्मचाऱ्यांची पहिली प्रतिक्रिया

First published: July 22, 2019, 8:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading