S M L
Football World Cup 2018

चिमुरडीच्या 'तो' व्हिडिओ पाहुन विराट-शिखर हादरले, महिलेला सुनावले खडेबोल

सोशल मीडियावर लहानग्या मुलीला दमदाटी करून शिकवणाऱ्या व्हिडिओवर त्याने तीव्र संताप व्यक्त केलाय.

Sachin Salve | Updated On: Aug 19, 2017 10:24 PM IST

चिमुरडीच्या 'तो' व्हिडिओ पाहुन विराट-शिखर हादरले, महिलेला सुनावले खडेबोल

 19 आॅगस्ट : मैदानावर आक्रमक राहणाऱ्या कॅप्टन विराट कोहलीचं आज वेगळं रुप पाहायला मिळालं. सोशल मीडियावर लहानग्या मुलीला दमदाटी करून शिकवणाऱ्या व्हिडिओवर त्याने तीव्र संताप व्यक्त केलाय. विराटसोबत शिखर धवननेही जाहीर नाराजी व्यक्त करत अशा आई-वडिलांना चांगलाच समज दिलाय.

सोशल मीडियावर काय व्हायरल होईल याचा नेम नाही. नुकताच एका लहानग्या मुलीला घरी शिकवणीचा मन हेलावून टाकणार व्हिडिओ व्हायरल झालाय. या व्हिडिओत एक महिला लहान मुलीचे आकडेमोड शिकवणी घेत असताना दमदाटी करते. ही मुलगी इतकी भेदरलेली आहे की ती "मला प्रेमाने सांगा" अशी विनवणी करतेय पण ही महिली चिमुरडी 5 पर्यंत आकडेमोड चुकते म्हणून तोंडात चापट लगावते.

हा व्हिडिओ पाहून टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली हादरून गेलाय. विराटने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअऱ करून संताप व्यक्त केलाय. "हा व्हिडिओ मन हेलावून टाकणार आहे. जर मुलांना दमदाटी करून शिकवणार असाल तर ते कधीच शिकणार नाही" असा सल्ला देत विराटने या व्हिडिओबद्दल दु:ख व्यक्त केलंय.

तर विराट पाठोपाठ शिखर धवननेही तीव्र नाराजी व्यक्त केलीये. शिखर धवन म्हणतो, "हा आतापर्यंतचा सगळ्यात मन विचलित करणारा व्हिडिओ आहे. आई-वडील म्हणून आपल्या पाल्याला योग्य संस्कार देण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपली मुलं सक्षम व्हावी यासाठी आई-वडील असतात.  हा व्हिडिओ खूप वेदनादायक आहे. ही महिला त्या लहान मुलीला मानसिक, शारीरिक आणि भावनिकरित्या परेशान करत आहे. कारण काय तर ती 5 पर्यंत आकडेमोड करू शकत नाही."  

शिखर धवन पुढे म्हणतो, "या व्हिडिओत दिसणारी ही गोड मुलगी जेव्हा मोठी होईल तेव्हा ती सक्षम महिला म्हणून समोर येईल. तेव्हा तिला आज मारहाण करणारी महिला वृद्ध होईल. मग तेव्हा ही महिला अशाच प्रकारे या मुलीला मारहाण आणि दमदाटी करू शकेल का ??"

The fact that the pain and anger of the child is ignored and ones own ego to make the child learn is so massive that compassion has totally gone out of the window. This is shocking and saddening to another dimension. A child can never learn if intimidated. This is hurtful.

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

#Repost @aesha.dhawan5 (@get_repost) ・・・ THIS IS ONE OF THE MOST DISTURBING VIDEOS I HAVE COME ACROSS!!!!! AS PARENTS WE HAVE BEEN GIVEN THE PRIVILEGE OF RAISING OUR CHILDREN!!! WE ARE HERE TO MAKE THEM STRONG INDIVIDUALS WHO CAN BECOME WHO THEY ARE MEANT TO BE. IT HAS DISGUSTED ME THAT THIS LADY IS ABUSING THIS CHILD EMOTIONALLY, MENTALLY AND PHYSICALLY JUST SO SHE CAN COUNT TO 5!!!! THE CHARACTER OF ANY PERSON IS ALWAYS SHOWN WHEN THEY HAVE POWER OVER SOMEONE AND HOW THEY USE THIS POWER!!! LIFE IS FULL CIRCLE AND I PRAY THAT THIS BEAUTIFUL LITTLE GIRL GROWS UP TO BE A STRONG WOMAN ONE DAY!!! WHAT WILL HAPPEN WHEN THIS CHILD GROWS UP TO BE STRONG AND THIS LADY BECOMES OLD AND FRAIL AND IS AT THE MERCY OF THIS LITTLE GIRL!!! SHOULD SHE EXPECT A SLAP AND DOMINATION THEN????THIS LADY SHOULD BE ACCOUNTABLE AND DISGUSTED IN HERSELF TO DO THIS TO AN INNOCENT LITTLE GIRL!!! SHE IS A COWARD AND ONE OF THE WEAKEST PEOPLE ON EARTH THAT SHE IS SHOWING DOMINANCE OVER A CHILD!! LEARNING SHOULD BE FUN AND ENJOYABLE NOT FEARED AND HATED!!! EDUCATION IS VERY IMPORTANT BUT NOT AT THE COST OF A CHILD'S SOUL!!!!

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial) on

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 19, 2017 10:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close