Relationship Goals: 'विरुष्का'चा हा नवा फोटो पाहिलात का?

Relationship Goals: 'विरुष्का'चा हा नवा फोटो पाहिलात का?

सेलिब्रिटी जोडपं कसं असावं याचा दाखला देण्यासाठी विरुष्का हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, ३० जुलैः भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली अनेकदा सोशल मीडियावर पत्नी अनुष्का शर्मासोबतचे फोटो शेअर करत असतो. सध्या विराट कोहली आणि टीम इंग्लंड दौऱ्यावर आहे. १ ऑगस्टपासून भारत आणि इंग्लंडदरम्यान ५ कसोटी सामन्याला सुरूवात होणार आहे. विराटने रविवारी त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अनुष्का शर्मासोबतचा रोमॅण्टिक फोटो शेअर केला. त्याच्या या फोटोला अल्पावधीतच लाखो लाइक्स आणि शेअरही आले. नेहमीप्रमाणे विरुष्काची ही जोडी सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली. एकीकडे क्रिकेट दौऱ्यांमध्ये व्यग्र असलेला विराट अनुष्कालाही वेळ देतो. विराट जेवढा क्रिकेट दौऱ्यांमध्ये व्यग्र असतो तेवढीच अनुष्काही तिच्या सिनेमांच्या चित्रीकरणांमध्ये व्यग्र असते. पण तरीही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा हे जोडपं एकमेकांना वेळ देण्याचा प्रयत्न करतात. सेलिब्रिटी जोडपं कसं असावं याचा दाखला देण्यासाठी विरुष्का हे सर्वोत्तम उदाहरण आहे.

Just being able to walk around feels like the most joyous thing in the world. 😊♥️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

या फोटोमध्ये विराटने जीन्सचं शर्ट घातलं असून टोपीही घातली आहे. तर अनुष्काने काळ्या रंगाचा टॉप घातला आहे. या फोटोला कॅप्शन देताना विराटने लिहिले की, ‘तुझ्यासोबत काही क्षण चालायला जरी मिळालं तरी तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण असतो.’ कोहलीसाठी याआधीचा इंग्लंड दौरा फार खराब गेला होता. पण प्रशिक्षण रवी शास्त्री यांच्या मते, गेल्या ४ वर्षांपासूनचा विराटचा परफॉर्मन्सने त्याच्यातील आत्मविश्वास वाढवला आहे. त्यामुळे विराटसाठी हा कसोटी दौरा फार महत्त्वपूर्ण असणार आहे यात काही शंका नाही.

हेही वाचा-

VIDEO : राजस्थानमध्ये स्पर्धा सुरू असतानाच स्टेडियम पत्त्यासारखं कोसळलं, 17 जखमी

शोकसागरात बुडाले दापोली; चार भावांवर एकाच वेळेस अंत्यसंस्कार

'मराठा क्रांती मोर्चाचे कुठलेही समन्वयक मुख्यमंत्र्यांच्या भेटीला जाणार नाहीत'

First published: July 30, 2018, 10:34 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading