Home /News /sport /

बांधलेल्या हातांनी खूर्चीवर बसलेला विराट, पाहा कशामुळे झाली कॅप्टनची अशी अवस्था

बांधलेल्या हातांनी खूर्चीवर बसलेला विराट, पाहा कशामुळे झाली कॅप्टनची अशी अवस्था

विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या कॅप्टन्सीमध्ये पुन्हा एकदा आरसीबीला (RCB) आयपीएल चॅम्पियन बनवता आलं नाही. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर राहिली.

    मुंबई, 15 ऑक्टोबर : विराट कोहलीला (Virat Kohli) आपल्या कॅप्टन्सीमध्ये पुन्हा एकदा आरसीबीला (RCB) आयपीएल चॅम्पियन बनवता आलं नाही. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर राहिली. चाहत्यांना यंदा तरी टीम चॅम्पियन होईल असं वाटलं होतं, पण एलिमिनेटरमध्ये कोलकाता नाईट रायडर्सनी (KKR) त्यांचा पराभव केला. आरसीबीचा कॅप्टन म्हणून विराटचा हा अखेरचा मोसम होता, त्यामुळे आता विराटच्या नेतृत्वात आरसीबीला यापुढे कधीच ट्रॉफी जिंकता येणार नाही. आयपीएल संपल्यानंतर विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेयर केला आहे. या फोटोमध्ये बायो-बबलमधला त्रास किती असतो, हे सांगण्याचा प्रयत्न केला. विराट कोहली इतर भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणेच गेला काही काळ बायो-बबलमध्ये (Bio-Bubble) आहे. इन्स्टाग्रामवर एक फोटो शेयर करत विराटने बायो-बबलमध्ये राहणं किती कठीण असतं हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या फोटोमध्ये विराट एका खूर्चीवर बसला आहे आणि त्याचा हात दोरीने बांधून ठेवण्यात आला आहे. virat kohli ipl 2021 bio bubble 'बायो-बबलमध्ये खेळणं अशाप्रकारचं असतं,' असं कॅप्शन विराटने या फोटोला दिलं आहे. कोरोना व्हायरसमुळे खेळाडूंना सध्या बायो-बबलमध्ये राहावं लागत आहे. मे महिन्यापासून टीम इंडिया अशाप्रकारच्या वातावरणात आहे. बायो-बबलमध्ये खेळाडूंचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो. बायो-बबल बाहेर असलेल्या कोणालाही खेळाडूंना भेटता येत नाही. आयपीएल संपल्यानंतर आता विराट टीम इंडियाच्या बायो-बबलमध्ये जाणार आहे. 17 ऑक्टोबरपासून टी-20 वर्ल्ड कपला (T20 World Cup) सुरुवात होणार आहे. युएई आणि ओमानमध्ये ही स्पर्धा खेळवली जाईल. टी-20 वर्ल्ड कपनंतर विराट या फॉरमॅटमधली टीम इंडियाची कॅप्टन्सीही सोडणार आहे.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: IPL 2021, RCB, T20 world cup, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या