Home /News /sport /

विराट कोहली शब्दाला जागला, 10 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट खरं करून दाखवलं!

विराट कोहली शब्दाला जागला, 10 वर्षांपूर्वी केलेलं ट्विट खरं करून दाखवलं!

आयसीसीने (ICC) नुकतेच या दशकातील सर्वोत्तम वनडे, टेस्ट आणि टी-20 टीमची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला तीनही टीममध्ये स्थान मिळाले आहे.

मुंबई, 29 डिसेंबर : आयसीसीने (ICC) नुकतेच या दशकातील सर्वोत्तम वनडे, टेस्ट आणि टी-20 टीमची घोषणा केली आहे. यामध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याला तीनही टीममध्ये स्थान मिळाले आहे. त्यामुळे विराट कोहलीचं सगळीकडे कौतुक होत आहे. याचबरोबर त्याला दशकातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटर म्हणून देखील पुरस्कार मिळाला आहे. तसंच दशकातील सर्वोत्तम वनडे खेळाडू म्हणून त्याने सर गारफील्‍ड सोबर्स ट्रॉफी (Sir Garfield Sobers) देखील मिळवली आहे. हे पुरस्कार मिळाल्यानंतर त्याने आपले 10 वर्षांपूर्वीचं ट्विट शेअर केलं. 16 मार्च 2010 साली विराट कोहलीने हे ट्विट केलं होतं. टीमसाठी भरपूर रन करण्यासाठी उत्सूक आहे, असं ट्विट विराटने तेव्हा केलं होतं. आयसीसीने(ICC) या पुरस्कारांची घोषणा केली. यानंतर कोहलीने आपले 16 मार्च 2010 ला केलेलं ट्विट शेअर केलं आहे. या ट्विटमध्ये त्याने भारतीय टीमसाठी खूप रन करायचे असल्याचे म्हटले होते. त्यामुळे तेव्हापासूनच त्याने आपली मेहनत सुरु केली होती. त्याला या मेहनतीचे फळ मिळत असून आज जगातील सर्वोत्तम खेळाडूंमध्ये त्याची गणना होते. आज विराट कोहली (Virat Kohli) क्रिकेटमधील तीनही प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू असून दशकातील सर्वोत्तम पुरुष खेळाडू म्हणून त्याला पुरस्कार देखील मिळाला आहे. या प्रवासात साथ देणाऱ्या सर्वांचे त्याने या ट्विटमध्ये आभार मानले. या ट्विटमध्ये त्याने कोच, कुटुंब, मित्र आणि त्याला मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. माझ्या या प्रवासात मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे आभार असे ट्विट विराटने केलं. या पुरस्कारासाठी नामांकित करणाऱ्या आयसीसीचे(ICC) आणि त्याला मत देणाऱ्या सर्वांचे बीसीसीआयचे (BCCI) देखील त्याने आभार मानले. 10 वर्षांपूर्वी मी हे आशादायी ट्विट केलं होतं, तुम्ही स्वत:वर विश्वास ठेवलात आणि योग्य कारणासाठी खेळलात, तर कितीही मोठं स्वप्न पूर्ण होतं, मग कितीही अडथळे आणि आव्हानं येऊदेत. तुम्ही विश्वासाने पुढे जात राहाल आणि आपली स्वप्न पूर्ण होतात, हे तुम्हाला दिसेल, पुन्हा एकदा धन्यवाद, असं विराट म्हणाला आहे. विराटची पत्नी अनुष्का शर्मा (Anushka Sharma) बाळाला जन्म देणार असल्याने त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून सुट्टी घेतली आहे. पुढच्या महिन्यात इंग्लंडची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे, तेव्हा विराट पुन्हा मैदानात उतरेल.
First published:

पुढील बातम्या