S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

दिल्ली प्रदूषणावर विराट कोहलीनं सांगितला तोडगा

आता प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली याने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

Sonali Deshpande | Updated On: Nov 17, 2017 11:49 AM IST

दिल्ली प्रदूषणावर विराट कोहलीनं सांगितला तोडगा

17 नोव्हेंबर : दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रदूषणामुळे दिल्लीकर जीव मुठीत घेऊन जगत आहे. या प्रदूषणावर दिल्ली सरकार, इतर राज्य आणि नेते मंडळींनी तोडगा काढण्याऐवजी त्यांचे आरोप-प्रत्यारोप काही संपत नाहीत. आणि म्हणूनच आता प्रदुषणाबाबत जनजागृती करण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचे कर्णधार विराट कोहली याने इंस्टाग्राम आणि ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओमध्ये कोहलीने जनतेला आव्हान केलं आहे की हे वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांचा वापर करा.

हा व्हिडिओ शेअर करताना त्याने  'मुझे फर्क पडता है' हा हॅशटॅग करून असं लिहिलं आहे.


त्यात तो म्हणाला की, 'तुम्हाला माहीत आहे सध्या दिल्लीमध्ये किती प्रदूषण झालं आहे ते. प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे.  यावर आपण काय करू शकतो याचा विचार करूयात. प्रदूषणाविरूद्धचा संघर्ष जर आपल्याला जिंकायचा असेल तर सगळ्यांना एकत्र यावं लागेल. कारण या वाढत्या प्रदूषणाला थांबवणं आपली जबाबदारी आहे. खासकरुन  दिल्लीत राहणाऱ्यांची ही प्रमुख जबाबदारी आहे.'

'आपल्या सगळ्यांना खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहनांनी प्रवास केला पाहिजे. जास्तीत जास्त बस, मेट्रो आणि शेअर टॅस्कीचा वापर करा. तुम्ही आठवड्यात एकदा जरी असं केलं तरी त्याने प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. कारण क्रिया छोटी असो वा मोठी फरक पडतोच.'

खरं आहे आपल्या सगळ्यांच्या छोट्याश्या मदतीनेच आपण प्रदूषणावर मात करू शकतो. या वाढत्या प्रदूषणाला आपणच कुठेतरी जबाबदार आहोत, हेही आपल्याला विसरून चालणार नाही. त्यामुळे आपल्या लाडक्या विराटचा हा सल्ला आपण सगळेच अमलात आणूयात आणि प्रदूषणावर मात करुयात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 17, 2017 11:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close