मॉलमध्ये पाणी विकताना दिसला विराट कोहली, पाहा काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

मॉलमध्ये पाणी विकताना दिसला विराट कोहली, पाहा काय आहे VIRAL VIDEO मागचं सत्य

असं काय झालं की मॉलमध्ये पाणी विकतोय कॅप्टन कोहली.

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : भारताचा कर्णधार विराट कोहली आपल्या शानदार फलंदाजीसाठी ओळखला जातो. विराट कोहली जेवढा भर आपल्या फलंदाजीवर देतो, तेवढाच कल त्याचा फिटनेसकडेही असतो. क्रिकेट जगतात सर्वात तंदुरुस्त खेळाडू म्हणून विराटची ओळख आहे. त्यासाठी विराटनं गेल्या काही वर्षात अखंड मेहनत आणि सातत्य राखले आहे.

विराट कोहलीच्या जबरदस्त फिटनेसमागचे सर्वात मोठे गुपित म्हणजे, तो आपल्या डायटवर म्हणजेच खाण्या-पिण्यावर विशेष लक्ष देतो. त्याचबरोबर विराट पाणी पिण्यावरही तेवढाच भर देतो. तुम्हाला विश्वास बसणार नाही, चक्क विराट फ्रॉन्सचे पाणी पितो. विराट फ्रान्सवरून पाणी आयात करतो, त्याची किंमत जवळजवळ 600 रुपये प्रति लीटर आहे.

महत्त्वाचे म्हणजे विराट आपल्या फिटनेसबाबत फार सतर्क असतो. त्यासाठी तो कोणत्याही प्रकारचे मसालेदार किंवा बाहेरचे जंक फुड खात नाही, त्यामुळं त्याची तुलना जगातली सर्वात हिट खेळाडू म्हणून केली जाते.

दरम्यान, सध्या विराटचा एका व्हिडीओ व्हायरल होत आहे. कोहलीनं आपला एक ब्रॅण्ड नुकताच लॉंच केला आहे. विराट आता ओशन-8 नावाच्या पाण्याची कंपनीचा मालक झाला आहे. विराटनं स्वत: आपल्या ट्विटरवर पाणी विकतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये विराट लोकांना आपल्या ब्रॅण्डचे पाणी विकताना दिसत आहे.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघानं गेल्या 2 वर्षात शानदार कामगिरी केलेली आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतानं आपल्या घरच्या मैदानावर 11 कसोटी सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. त्याचबरोबर क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच त्यांनी दक्षिण आफ्रिका संघाला व्हाईटवॉश दिला. दरम्यान विराटला बांगलादेश विरोधात होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 26, 2019 03:54 PM IST

ताज्या बातम्या