• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • T20 WC : ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी विराट कोहलीने 'playing 11' वर केला खुलासा

T20 WC : ‘हाय-व्होल्टेज’ सामन्यापूर्वी विराट कोहलीने 'playing 11' वर केला खुलासा

Virat Kohli

Virat Kohli

टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी टी20 वर्ल्ड कपमधील महामुकाबला होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहली (Virat Kohli)आणि बाबर आझम(Babar Azam) यांची टीम जोरदार सराव करत आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर: टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात रविवारी टी20 वर्ल्ड कपमधील महामुकाबला होणार आहे. दुबईमध्ये होणाऱ्या या मॅचसाठी विराट कोहली (Virat Kohli)आणि बाबर आझम(Babar Azam) यांची टीम जोरदार सराव करत आहे. दरम्यान विराटला एका पत्रकार परिषदेत 'प्लेइंग XI' (playing 11)संदर्भात विचारले असता त्याने या गोष्टीवर अधिक भाष्य करने टाळले. त्याने मी आत्ता 'प्लेइंग XI' वर केला खुलासा करु शकत नाही असे स्पष्ट केले. टीम इंडिया आज टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानशी भिडणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कप्तान विराट कोहलीने व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी बोलताना त्याने पाकिस्तान संघ आणि त्यांच्या काही खेळाडूंना मजबूत मानले आहे. त्यामुळे या सामन्यासाठी टीम इंडिया आणखी ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे म्हटले आहे. याचवेळी, विराटला 'प्लेइंग XI' संदर्भात विचारले. त्यावर विराट म्हणाला,' हे बघा, आमच्या संघात खूप चांगले संतुलन आहे. मैदानावर पाकिस्तानविरुद्ध कोणत्या अकरा खेळाडूंना घ्यायचे हे आम्हाला चांगले माहित आहे पण आत्ता आम्ही हे उघड करू शकत नाही.' असे ठाम मत यावेळी व्यक्त केले. विराटने पाकिस्तानविरुद्धच्या शेवटच्या टी -20 विश्वचषकाच्या कामगिरीदेखील आपले मत मांडले. आम्ही यापूर्वी काय केले यावर आम्ही चर्चा कधीच केली नाही. मी सांगितल्याप्रमाणे या सर्व गोष्टी तुमचे लक्ष विचलित करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कशी तयारी करता आणि या दिवशी तुम्ही कोणत्या प्रकारचे क्रिकेट खेळता. आम्ही चांगले क्रिकेट खेळलो आणि सक्षम होतो. यामुळे आम्ही पाकिस्तानचा त्यावेळी पराभव करु शकलो. तसेच तो पुढे म्हणाला, ”पाकिस्तानचा संघ मजबूत आहे. तुम्हाला प्रत्येक वेळी त्यांच्याविरुद्ध सर्वोत्तम खेळ खेळावा लागेल. त्याच्या संघात असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याचा कलाटणी देऊ शकतात. आम्ही पाकिस्तानविरुद्ध आमचा चांगल्या दर्जाचा खेळ नक्कीच दाखवू.” असे सांगत विराटने या सामन्यासाठी टीम इंडिया आणखी ताकदीने मैदानात उतरणार असल्याचे सांगितले. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने उद्याच्या सामन्यासाठी 12 खेळाडूंची घोषणा केली आहे. तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने सामन्यापूर्वी संघाची घोषणा करण्यास असहमती दर्शवली आहे.

  पाकिस्तान संघ

  बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), फखर जमान, हैदर अली, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, आसिफ अली, शादाब खान, इमाद वसीम, हॅरिस रौफ, हसन अली, शाहीन शाह आफ्रिदी.
  Published by:Dhanshri Otari
  First published: