क्रिकेट माझ्या रक्तात, ब्रेकचा परिणाम होणार नाही - विराट कोहली

दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना झालीये. त्या अगोदर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मीडियाशी संवाद साधला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Dec 28, 2017 11:15 AM IST

क्रिकेट माझ्या रक्तात, ब्रेकचा परिणाम होणार नाही - विराट कोहली

28 डिसेंबर : दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडिया रवाना झालीये. त्या अगोदर कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी मीडियाशी संवाद साधला. टीम इंडियाला कुणाला काहीही सिद्ध करून दाखवण्याची गरज नसल्याचं विराट यावेळी म्हणाला. तसंच क्रिकेट माझ्या रक्तात, त्यामुळे ब्रेकचा परिणाम होणार नाही असं विराट म्हणाला. दक्षिण आफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी पत्रकार परिषदेत विराट बोलत होता.

परदेशात भारतीय टीम अपयशी ठरते. आणि विराट कोहली आणि त्याच्या संघाला हा इतिहास बदलण्याची संधी आहे. दक्षिण आफ्रिकेत भारत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकू शकलेला नाही. २०१७मध्ये कसोटीमध्ये अग्रस्थानी असलेल्या भारतीय संघासाठी दक्षिण आफ्रिका दौरा खरं आव्हान ठरणार आहे. या दौऱ्यात ३ कसोटी, ६ एकदिवसीय आणि ३ टी-२० सामने भारतीय संघ खेळणार आहे.

मुंबईतल्या रिस्पेशननंतर विराट आता अॅक्शनमध्ये दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी अनुष्काही विराट सोबत दक्षिण आफ्रिकेला रवाना झालीये.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 28, 2017 11:15 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...