Home /News /sport /

अजब योगायोग! कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर समोर आलं विराटचं 'पुणे कनेक्शन'!

अजब योगायोग! कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर समोर आलं विराटचं 'पुणे कनेक्शन'!

टीम इंडियाचा सुपरस्टार क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीची (Virat Kohli Sacked) वनडे कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे, यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. वनडे कॅप्टन्सी काढून घेतल्यावर 72 तासांनंतरही विराटने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 डिसेंबर : टीम इंडियाचा सुपरस्टार क्रिकेटपटू असलेल्या विराट कोहलीची (Virat Kohli Sacked) वनडे कॅप्टन्सी काढून घेण्यात आली आहे, यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. वनडे कॅप्टन्सी काढून घेतल्यावर 72 तासांनंतरही विराटने यावर प्रतिक्रिया दिलेली नाही. दुसरीकडे विराटचे लहानपणीचे कोच राजकुमार शर्मा यांनी विराटचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचा गौप्यस्फोट केला आहे. बीसीसीआय (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून का काढण्यात आलं याचं उत्तर दिलं आहे. टी-20 वर्ल्ड कपआधीच विराटने आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं जाहीर केलं होतं. जास्त क्रिकेट होत असल्यामुळे आणि बाकीच्या दोन्ही फॉरमॅटमध्ये लक्ष केंद्रीत करण्यासाठी आपण हा निर्णय घेत असल्याचं विराटने सांगितलं होतं. विराटच्या या वक्तव्यानंतर तो वनडे आणि टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून कायम राहिल, असं सांगितलं जात होतं. पण सौरव गांगुलीने विराटला टी-20 टीमचीही कॅप्टन्सी सोडू नकोस असं सांगितलं होतं. तरीही विराटने गांगुलीची ही विनंती मान्य केली नाही. मर्यादित ओव्हरच्या क्रिकेटसाठी दोन फॉरमॅटमध्ये दोन कर्णधार असणं निवड समितीला पटत नव्हतं, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं सौरव गांगुलीने स्पष्ट केलं. विराटचं पुणे कनेक्शन विराटची वनडे टीमची कॅप्टन्सी जाताच आता पुणे कनेक्शन समोर आलं आहे. विराट कोहलीने 2017 साली इंग्लंडविरुद्ध पुण्यात पहिल्यांदा वनडे टीमची कॅप्टन्सी केली, तसंच विराटची कॅप्टन म्हणून अखेरची वनडेही इंग्लंडविरुद्धच पुण्यात यावर्षाच्या सुरुवातीला झाली. विराटच्या नेतृत्वात भारताने 95 पैकी 65 मॅच जिंकल्या.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Team india, Virat kohli

    पुढील बातम्या