Elec-widget

ICC Test Ranking : कसोटी क्रमवारीतही विराटच बादशाह, तर टीम इंडिया नंबर वन!

ICC Test Ranking : कसोटी क्रमवारीतही विराटच बादशाह, तर टीम इंडिया नंबर वन!

आयसीसी कसोटी क्रमवारीत विराट कोहली पहिल्या क्रमांकाचा फलंदाज तर, चेतेश्वर पुजारा (881) तिसऱ्या स्थानांवर आहे.

  • Share this:

लंडन, 23 जुलै : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आयसीसीच्या नव्यानं जाहीर झालेल्या कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 2-1नं विजय मिळवत कोहलीच्या खात्यात 922 गुण जमा झाले आहेत. तर, न्यूझीलंडचा केन विलियम्सन 913 गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. या क्रमवारीत चेतेश्वर पुजारा (881) तिसऱ्या स्थानांवर आहे. तसचे, फलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टिव्ह स्मिथ चौथ्या तर न्यूझीलंडचा हेन्री पाचव्या स्थानावर आणि इंग्लंडचा जो रूट सहाव्या स्थानावर आहे.

दुसरीकडे, गोलंदाजांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने 878 गुणांसह अव्वल स्थान कायम राखले आहे. तर, इंग्लंडचा दिग्गज गोलंदज जेम्स अँडरसन (862) आणि दक्षिण आफ्रिकेचा युवा गोलंदाज कागिसो रबाडा (851) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या यादीत भारताचा रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांनी स्थान कायम राखले आहे. जडेजा सहाव्या, तर अश्विन दहाव्या स्थानावर कायम आहे. भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. तेथे भारतीय संघ दोन कसोटी सामने खेळणार आहे.

Loading...

टीम इंडिया सर्वात वरचढ

कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर आहे तर, न्यूझीलंज दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर, दक्षिण आफ्रिका तीसऱ्या, इंग्लंड चौथ्या आणि ऑस्ट्रेलिया पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानंतर श्रीलंका, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि झिम्बाम्वे यांचा क्रमांक लागतो.

वाचा-BCCIचं अफगाणला मोठं गिफ्ट, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडणार!

जेसॉन होल्डर सर्वश्रेष्ठ ऑलराऊंडर

अष्टपैलू खेळाडूंमध्ये भारताच्या रवींद्र जडेजानं तिसरे, तर वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर आणि बांगलादेशचा शकिब अल हसन अनुक्रम पहिल्या व दुसऱ्या स्थानावर आहेत.

वाचा- IND vs WI : निवड समितीच्या निर्णयावर नाराज झाला टीम इंडियाचा स्टार खेळाडू

वाचा-कोहलीनंतर आता 'हा' पुणेकर टीम इंडियाचं नवं रन मशिन!

VIDEO : पंतप्रधान मोदींचा हा खास 'मित्र' आहे तरी कोण?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 23, 2019 07:51 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...