नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर: क्रिकेट जगतातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या One8 कम्युन रेस्टॉरंटवर LGBTQ+ समुदायातील लोकांना प्रवेश न दिल्याचा (Virat Kohli restaurant no entry for lgbtq community One8 Commune) आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे सोशल मीडियातून विराटवर टीकेची झोड उठली आहे.
विराटच्या या रेस्टॉरंटच्या पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे शाखा आहेत. LGBTQIA+ समुदायाच्या हक्कांचे रक्षण करणार्या एका गटाने इंस्टाग्रामवर भेदभावाचा आरोप करत पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
“LGBTQ+ समुदयाला विराट कोहलीच्या रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही.विराट पुणे, दिल्ली आणि कोलकाता येथे One8 Commune नावाचे रेस्टॉरंट चालवतो. त्यांच्या Zomato सूचीमध्ये असे म्हटले आहे की रेस्टॉरंटमध्ये स्टॅगसाठी प्रवेश नाही. आम्ही त्याला 2 आठवड्यांपूर्वी मेसेज केला होता. त्यांच्याकडून कोणतेही उत्तर मिळाले नाही.
आम्ही त्यांच्या रेस्टॉरंटच्या पुणे शाखेशी संपर्क साधला, त्यांनी आम्हाला फोनवर सांगितले की रेस्टॉरंटमध्ये प्रवेश फक्त सिजेंडर हेटेरोसेक्शुअल जोडप्यांना किंवा सिजेंडर महिलांच्या गटांसाठी आहे. समलिंगी जोडप्यांना किंवा समलिंगी पुरुषांच्या गटांना प्रवेशाची परवानगी नाही. ट्रान्स महिलांना त्यांच्या कपड्यांनुसार प्रवेश दिला जातो.
या मुद्द्यावर आम्ही रेस्टॉरंटच्या दिल्ली शाखेकडे उत्तर मागितले असता त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. कोलकाता शाखेने आम्हाला सांगितले की प्रत्येकाला येथे प्रवेश आहे. मात्र, झोमॅटोवर वेगळी माहिती दर्शवते. भारतातील अशा फॅन्सी रेस्टॉरंट, बार आणि क्लबमध्ये LGBTQ समुदायाविरुद्ध अनेकदा भेदभाव केला जातो. आणि विराट कोहलीही तेच करतोय. याशिवाय, समूहाने असेही म्हटले आहे की त्यांनी झोमॅटोला ईमेल करून विचारले आहे की त्यांनी विराट कोहलीला "संवेदनशील करण्याचा प्रयत्न" केला आहे का?
सध्या ही पोस्ट व्हायरल होत असून विराटला ट्रोल करण्यात येत आहे. दरम्यान, One8 Commune ने एक निवेदन जारी केले की, “रेस्टॉरंट चेन सर्व लोकांचे लिंग आणि प्राधान्ये विचारात न घेता त्यांचे स्वागत करण्यावर विश्वास ठेवते. आमच्या नावाप्रमाणे, आम्ही आमच्या स्थापनेपासून सर्व समुदायांची सेवा करण्यात नेहमीच समावेशक आहोत.”
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Virat kohli, Virat kohli business