• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • IND vs NZ सामन्यापूर्वी किवींच्या बॉलरने दिला इशारा, मात्र Virat Kohliने खास शैलीत दिले प्रत्युत्तर

IND vs NZ सामन्यापूर्वी किवींच्या बॉलरने दिला इशारा, मात्र Virat Kohliने खास शैलीत दिले प्रत्युत्तर

Virat Kolhli

Virat Kolhli

भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये सर्वाधिक दबाव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहे.

 • Share this:
  दुबई, 31 ऑक्टोबर: भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात रविवारी होणाऱ्या मॅचमध्ये सर्वाधिक दबाव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीवर (Virat Kohli) असणार आहे. दरम्यान, विराटपुढे आणखी एक संकट उभे ठाकले आहे. ते म्हणजे न्यूझीलंडचा बॉलर ट्रेंट बोल्ट. बोल्ट याने, (trent boult) शाहीन अफरीदीसारखीच गोलंदाजी करणार असल्याचा इशारा दिला आहे. मात्र, विराटने खास आपल्या शैलीत बोल्टला प्रत्युत्तर दिले आहे. भारतसोबत होणाऱ्या सामन्यापूर्वी, बोल्टने पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज शाहीन आफ्रिदीचे कौतुक केले. भारतासोबत झालेल्या सामन्यात शाहीन आफ्रिदीने ज्याप्रकाने गोलंदाजी केली ती वाखण्याजोगी होती. माझ्यादेखील गोलंदाजीला वेग आहे. आणि चेंडू स्विंगही होतो. मला आशा आहे की शाहीनने त्या रात्री काय केले. मीही त्याच पराक्रमाची पुनरावृत्ती करू शकतो. असे म्हणत बोल्टने टीम इंडियाला इशारा दिला. VIDEO: न्यूझीलंडच्या मॅचपूर्वी टीम इंडियाची पार्टी, शार्दुल-इशानचा धमाल डान्स

  विराट कोहलीने खास शैलीत दिले प्रत्युत्तर

  भारतीय कर्णधार विराट कोहलीने बोल्टला प्रत्युत्तर दिले आहे. तो म्हणाला, 'आम्ही चांगल्या गोलंदाजांविरुद्ध पुर्णक्षमतेसह मैदानात उतरु. पण काही गोष्टी या, खेळपट्टी आणि आपली मानसिकतेवर अवलंबून असतात. जर ट्रेंट बोल्ट पाकिस्तानी फलंदाज शाहीन आफ्रिदीसारखी कामगिरी करण्यास उत्सुक असेल तर आम्ही त्याच्याशी बरोबरी करण्यास तयार आहोत. आम्ही खूप पूर्वी न्यूझीलंडविरुद्ध खेळलो. असे बोल्टला उलट आव्हान देत, कोहलीने खास शैलीत प्रत्युत्तर दिले आहे. T20 World Cup मधून मोठी बातमी, धोनीपेक्षा यशस्वी कॅप्टननं केली निवृत्ती जाहीर बोल्टने आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो.

  न्यूझीलंडविरुद्ध भारताचे खराब रेकॉर्ड

  टीम इंडियाला आजपर्यंत टी-20 वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. टी-20 वर्ल्ड कपमध्ये दोन्ही देशांदरम्यान दोन सामने झाले असून त्यात किवी संघाने बाजी मारली आहे. आजचा सामना जिंकून भारतीय संघ उपांत्य फेरीत जाण्याची आशा पल्लवीत ठेवावी लागणार आहे. हा सामना भारतासाठी करा किंवा मरो असा आहे.

  परतफेड करण्याची संधी

  किवी संघाविरुद्धचा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास बदलू इच्छितो. वर्ल्ड कप 2019 च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध 18 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचबरोबर जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्येही किवी संघाने भारतीय संघाचा पराभव केला. टीम इंडियाला आजचा सामना जिंकून सर्व हिशेब चुकता करायचा आहे.
  Published by:Dhanshri Otari
  First published: