मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Virat Kohli ला वनडे कर्णधारपदावरून का हटवले? जाणून घ्या, 4 मोठी कारणे

Virat Kohli ला वनडे कर्णधारपदावरून का हटवले? जाणून घ्या, 4 मोठी कारणे

Virat Kohli

Virat Kohli

विराट कोहलीकडून (Virat Kohli) वनडे संघाचे कर्णधारपद का काढून घेण्यात आले, असा प्रश्न क्रिकेट जगतात उपस्थित होत आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 8 डिसेंबर: निवड समितीने व भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) रोहित शर्माकडे (Rohit Sharma)टी20 सह वनडे संघाचे नेतृत्वदेखील देऊ केले आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आता रोहित पूर्णवेळ वनडे संघाचा कर्णधार म्हणून काम पाहिल. दरम्यान, विराट कोहलीकडून (Virat Kohli) वनडे संघाचे कर्णधारपद का काढून घेण्यात आले, असा प्रश्न क्रिकेट जगतात उपस्थित होत आहे. तसेच, तो आता टेस्ट सिरीजच्याही कर्णधारपदावरून पायउतार होउ शकतो असे क्रिकेट वर्तुळात रंगले आहे.

Virat Kohli ला वनडे कर्णधारपदावरून का हटवले? जाणून घ्या, 4 मोठी कारणे

एकदिवसीय कर्णधार म्हणून विराट कोहलीचा विक्रम अप्रतिम आहे यात शंका नाही. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 19 पैकी 15 एकदिवसीय द्विपक्षीय मालिका जिंकल्या आहेत. मायदेशात त्याने 9 पैकी 8 द्विपक्षीय मालिका जिंकल्या पण विराट आयसीसी स्पर्धा जिंकू शकला नाही. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफी 2017, वर्ल्डकप 2019 जिंकण्यापासून वंचित राहिली आणि टी-20 वर्ल्डकप 2021 मध्ये उपांत्य फेरीतही पोहोचू शकली नाही.

बायो बबलमध्ये सतत राहणे आणि तिन्ही फॉरमॅटचे कर्णधार बनणे सोपे नाही. विराट कोहलीने सार्वजनिक मंचावर अनेकदा हे सांगितले आहे. तीन फॉरमॅटमध्ये खेळणे आणि संघाचे नेतृत्व करणे हे एक आव्हान आहे आणि त्याचा परिणाम आता विराट कोहलीच्या फलंदाजीवरही दिसून येत आहे. विराट कोहलीला गेल्या 2 वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. एकदिवसीय आणि टी-20कर्णधारपदावरून मुक्त झाल्यानंतर आता फलंदाज म्हणून विराट कोहलीला नक्कीच दिलासा मिळणार आहे.

विराट कोहलीला वनडे आणि टी-20 संघांच्या कर्णधारपदावरून हटवण्यामागचे एक कारण नवीन कोचिंग स्टाफ देखील असू शकते. राहुल द्रविड टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक बनला असून तो एका नव्या विचाराने संघात आला आहे. राहुल द्रविडला नव्या कर्णधारासह संघाला पुढे न्यायचे आहे, अशी शक्यता आहे.

विराट कोहलीकडून एकदिवसीय संघाचे कर्णधारपद काढून घेणे म्हणजे बीसीसीआयने त्याला स्पष्ट संदेश दिला आहे. अशा परिस्थितीत निवडकर्त्यांपासून ते बोर्डाच्या अधिकाऱ्यांपर्यंतचा कर्णधार म्हणून त्याच्यावरील विश्वास कमी झाला आहे. आता तो कसोटी संघातील कोणत्याही खेळाडूच्या बाजूने अधिक ठामपणे बोलू शकणार नाही. रोहितची कसोटीचा उपकर्णधार म्हणून केलेली नियुक्तीही याकडेच बोट दाखवत आहे.

First published:

Tags: BCCI, Rohit sharma, Virat kohli