32 कर्णधार करू शकले नाहीत अशी 'विराट' कामगिरी, तरीही कोहलीपुढं 'हे' आव्हान!

32 कर्णधार करू शकले नाहीत अशी 'विराट' कामगिरी, तरीही कोहलीपुढं 'हे' आव्हान!

भारताचा कर्णधार विराट कोहलीनं द्विशतकासह अनेक विक्रम केले तरीही त्याच्यापुढं अद्याप या क्रिकेटपटूंच्या कामगिरीचं आव्हान आहे.

  • Share this:

पुणे, 12 ऑक्टोबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत द्विशतक झळकावलं. यासह त्याने अनेक विक्रम केले. विराटनं 295 चेंडूत 28 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं नाबाद 254 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये विराटचे हे सातवं द्विशतक ठरलं. विराटनं 1 वर्ष 10 महिन्यांनंतर द्विशतक केलं आहे.

विराटने केलेली सातही द्विशतकं खास आहेत. काऱण ती सर्व द्विशतकं कर्णधार म्हणून त्यानं केली आहेत. भारताच्या कसोटी इतिहासात आतापर्यंतच्या 32 कर्णधारांना मिळून एकूण चारच द्विशतकं करता आली आहेत. सर्वाधिक द्विशतकांच्या यादीत त्याच्यापुढे डॉन ब्रॅडमन, कुमार संगक्कारा आणि ब्रायन लारा हे आहेत.

कोहलीने नऊवेळा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा केल्या आहे. या विक्रमासह विराटनं ऑस्ट्रेलियाचा कर्णधार डॉन ब्रॅडमनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सात वेळा 150 किंवा त्यापेक्षा जास्त धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तीन फलंदाजांचा समावेश आहे. यात ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क, श्रीलंकेचा महेला जयवर्धने आणि वेस्ट इंडिजचा ब्रायन लारा या दिग्गजांचा समावेश आहे.

द्विशतकासह विराटनं स्वत:च्या सर्वोत्तम धावसंख्येला मागे टाकले आहे. याआधी विराटनं 2017-18मध्ये श्रीलंकेविरोधात 243 धावा केल्या होत्या. विराटनं या धावसंख्येला मागे टाकले आहे. त्याचबरोबर विराट सर्वात जास्त धावा करणारा कर्णधार ठरला आहे. 2012-13मध्ये धोनीनं ऑस्ट्रेलियाविरोधात 224 धावा केल्या होत्या. तर, सचिननं 1999-00मध्ये न्यूझीलंड विरोधात 217 धावा केल्या होत्या.

वाचा : जडेजाला अर्धशतकानंतर जल्लोष करण्यापासून थांबवलं, विराटनेही घेतली फिरकी

एका द्विशतकासह अनेक विक्रम केले असले तरी विराटला अद्याप काही भारतीय खेळाडूंचे कसोटीतील विक्रम मोडण्याचं आव्हान असणार आहे. यामध्ये करूण नायर आणि विरेंद्र सेहवाग यांच्यासह राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचे आव्हान त्याच्यासमोर आहे.

सेहवागने त्याच्या कसोटी कारकिर्दीत दोन त्रिशतकासह दोनवेळा अडिचशे धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर करुण नायरने नाबाद 303 धावांची खेळी केली होती. भारताकडून व्हीव्हीएस लक्ष्मणने 281 तर राहुल द्रविडनं 270 धावा केल्या आहेत. यांना मागे टाकण्याचं आव्हान विराटसमोर आहे.

वाचा : 'पांड्या मी नेहमी तुझ्यासोबत', वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अभिनेत्री झाली भावूक

वाचा : क्रिकेट वाचवण्यासाठी अखेर ‘देव’ आला धावून, युवा खेळाडूंना दिला महत्त्वाचा सल्ला

SPECIAL REPORT: तळकोकणातील राजकीय शिमग्यात मुख्यमंत्र्यांची उडी?

First published: October 12, 2019, 1:26 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading