धोनीचा आणखी एक विक्रम विराटनं मोडला, गांगुली चौथ्या क्रमांकावर!

धोनीचा आणखी एक विक्रम विराटनं मोडला, गांगुली चौथ्या क्रमांकावर!

भारताने बांगलादेशविरुद्ध मोठा विजय साजरा करताच विराटने कर्णधार म्हणून आणखी एक विक्रम नावावर नोंदवला.

  • Share this:

इंदूर, 17 नोव्हेंबर : भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बांगलादेशविरुद्धच्या कसोटीत विजय मिळवला. भारतानं बांगलादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला. या विजयासह विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आणखी एक विक्रम मागे टाकला. प्रतिस्पर्धी संघाला सर्वाधिक वेळा डावाने पराभूत करण्याच्या भारतीय कर्णधारांच्या यादीत विराटनं पहिलं स्थान पटकावलं आहे.

विराटच्या नेतृत्वाखाली भारताने दहावेळा प्रतिस्पर्ध्यांना डावाने धूळ चारली आहे. या कामगिरीच्या जोरावर विराटनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला मागे टाकलं आहे. धोनी कर्णधार असताना भारताने 9 वेळा डावाने विजय मिळवला होता. त्याच्यानंतर मोहम्मद अझरुद्दीन आणि सौरव गांगुलीचा नंबर लागलो. या दोघांच्या नेतृत्वाखाली भारताने अनुक्रमे आठ आणि सातवेळा डावाने विजय मिळवला आहे.

भारताने दक्षिण आफ्रिकेला दोन वेळा डावाने पराभूत केलं. पुण्यातील कसोटीत एक डाव 137 धावांनी तर रांचीतील कसोटीत एक डाव 202 धावांनी आफ्रिकेवर विजय मिळवला. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यातही भारतानं तिच कामगिरी करत डावाने विजय मिळवला.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि 130 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात 343 धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव 213 धावात संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला.

झेल घेण्यासाठी रोहितनं सोडलं जेवण, सराव करत असलेला VIDEO VIRAL

भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (64) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग 13व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

प्रामाणिकपणे काम करणे शक्य नाही; क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षाने दिला राजीनामा

Published by: Suraj Yadav
First published: November 17, 2019, 8:29 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading