मुंबई, 16 जानेवारी : भारताने रविवारी श्रीलंकेविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळवला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने श्रीलंकेला 317 धावांनी धूळ चारत मालिकासुद्धा 3-0 ने जिंकली. श्रीलंकेचा संघ 22 षटकात अवघ्या 73 धावात बाद झाला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांच्या भेदक माऱ्यासमोर श्रीलंकेच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. दरम्यान, भारताचा कर्णधार रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या हाती चेंडू सोपवल्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पण श्रेयसने या षटकात जबरदस्त फिरकी गोलंदाजी केली.
श्रेयस अय्यर गोलंदाजी करत असताना विराट कोहली स्लीपमध्ये उभा होता. श्रेयसची गोलंदाजी पाहून विराटही चकीत झाला. श्रेयस अय्यरने लेग आणि ऑफ स्पिन असे दोन्ही चेंडू टाकल्यानं हे काय केलंस तू असाच काहीसा भाव विराटच्या चेहऱ्यावर होता.
Shreyas Iyer's bowling spin and Virat Kohli were surprised that it turned so much😂. PS- He bowls both legs and off-spinpic.twitter.com/RuYJqMfTiC
— Gaurav jain (@GauravJ43304117) January 15, 2023
हेही वाचा : सिराजला 5 विकेट मिळाव्या म्हणून रोहित शर्माची धडपड; पाहा काय काय केलं?
सामन्याचं 18 वं षटक टाकण्यासाठी रोहित शर्माने श्रेयस अय्यरच्या हाती चेंडू दिला. यात त्याने पहिला चेंडू लाहिरू कुमाराला टाकला. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर ऑफ स्टम्पकडे वळला. चेंडू वळताच केएल राहुलने यष्टीमागे तो अडवला. तेव्हा शेजारी स्लिपमध्ये उभा असणारा विराट कोहली आश्चर्यचकीत झाला होता. विराटने तोंडावर हात ठेवून रिअॅक्शन दिली.
श्रेयस अय्यरने एका षटकात फक्त दोन धावा दिल्या. त्याआधी फलंदाजी करताना चौथ्या क्रमांकावर खेळताना त्याने 32 चेंडूत 38 धावा केल्या होत्या. यात 2 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, India, Virat kohli