टीम इंडियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून विराट झाला 'सुपरमॅन', सामन्यानंतर म्हणाला...

टीम इंडियाचे ढिसाळ क्षेत्ररक्षण पाहून विराट झाला 'सुपरमॅन', सामन्यानंतर म्हणाला...

भारताचा कर्णधार विराट कोहलीने सीमारेषेवर घेतलेल्या कॅचची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

  • Share this:

तिरुवनंतपुरम, 09 डिसेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा रनमशिन म्हणून ओळखला जातो. याशिवाय क्षेत्ररक्षणातही तो तरबेज आहे. विंडीजविरुद्धचा सामना भारताने खराब फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणामुळे गमावला असला तरीही विराटने सीमारेषेवर धावत जाऊन घेतलेल्या कॅचची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे.

विंडीजविरुद्धच्या सामन्यात भारताला 8 विकेटने पराभव पत्करावा लागला. भारताकडून शिवम दुबेने अर्धशतकी खेळी केली. त्याच्या जोरावर भारताने 7 बाद 170 धावा केल्या. त्यानंतर विंडीजचा सलामीवीर सिमन्सने नाबाद अर्धशतकी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

दरम्यान, विराट कोहलीने हेटमायरचा सीमारेषेवर जबरदस्त झेल पक़डला. रविंद्र जडेजाच्या चेंडूवर हेटमायरने उंच फटका लगावला. सीमारेषेवर असलेल्या विराटने धावत जाऊन सूर मारत झेल टिपला. यावेळी तो मैदानावर पडलासुद्धा पण हातातील चेंडू सुटू दिला नाही.

सामन्यानंतर बोलताना विराट कोहली म्हणाला की, काही झेल असे असतात कि चेंडू हातात अडकून बसतो. मी चेंडू बघत होतो आणि फक्त हात पुढे केले. नशीबाने चेंडू हातात आला. याआधीच्या सामन्यात एका हाताने झेल घ्यायचा प्रयत्न केला होता पण जमलं नव्हतं. तुम्ही प्रयत्न करता पण अनेकदा झेल घेता येतोच असं नाही.

भारताला खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला. हैदराबादमध्येही ढिसाळ क्षेत्ररक्षणाचे प्रदर्शन टीम इंडियाने केले होते. तिरुवनंतपुरममध्ये तर यावर कडी केली. भुवनेश्वर कुमारच्या एकाच षटकात 2 झेल सुटले. पहिला झेल वॉशिंग्टन सुंदरने तर सिमन्सचा झेल सोडून मोठी चूक केली. त्यानेच विंडीजला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली. त्यानंतर एविस लुइसचा झेल पंतने सोडला. त्यानेही जीवदानाचा फायदा घेत 40 धावा फटकावल्या.

पहिल्या सामन्यात विराट कोहलीने नाबाद 94 धावांची खेळी केली होती. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला 17 चेंडूत 2 चौकारांसह 19 धावा करता आल्या. यानंतर तिसरा आणि निर्णायक सामना 11 डिसेंबरला होणार आहे.

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय गोलंदाजांनी सुमार कामगिरी केली. ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे भारताला 8 विकेटनं हा सामना गमवावा लागला. भारतानं दिलेले 171 धावांचे आव्हान वेस्ट इंडिजनं सहजरित्या पार केले. या सामन्यातही भारतानं मोक्याच्या क्षणी कॅच सोडल्या, त्यामुळं भारताला हा सामना गमवावा लागला. वेस्ट इंडिजकडून सिमन्सनं अर्धशतकी खेळी करत तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1ने बरोबरी केली.

Published by: Suraj Yadav
First published: December 9, 2019, 12:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading