मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये मुंबई-दिल्ली असे दोन गट', पाकच्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

'टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये मुंबई-दिल्ली असे दोन गट', पाकच्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

Team India dressing room

Team India dressing room

पाकिस्तानचा माजी क्रिकेटर मुश्ताक अहमदने (Mushtaq Ahmed) विराट आणि टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमसंदर्भात खळबळजनक दावा केला आहे.

  • Published by:  Dhanshri Otari

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: विराट कोहली (Virat Kohli) आता भारतीय क्रिकेट संघाचा टी-20 फॉरमॅटचा कर्णधार नाही. त्याच्या जागी ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. दरम्यान, विराटच्या या निर्णयाचे अनेक तर्कवितर्क क्रिकेट जगतात लावले जात आहेत. अशातच पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटर मुश्ताक अहमदने (Mushtaq Ahmed) विराट आणि टीम इंडियाच्या ड्रेसिंग (Indian Cricket Team) रूमसंदर्भात खळबळजनक दावा केला आहे. त्याने टीम इंडियामध्ये काहीतरी गडबड असल्याचे म्हटले आहे.

गेल्या काही वर्षांपासून विराट कोहलीने कर्णधार म्हणून भारतीय संघासाठी मोलाची भूमिका बजावली आहे. परंतु टी२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

'भारतीय ड्रेसिंग रूममध्ये दोन गट आहेत...'

अशातच पाकिस्तान संघाचे माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमदने टीम इंडियामध्ये काहीतरी गडबड असल्याचे म्हटले आहे. तो म्हणाला, “जेव्हा एक यशस्वी कर्णधार आपले पद सोडण्याचा विचार करतो. त्यावेळी एकच गोष्ट असू शकते, ती म्हणजे ड्रेसिंग रूमचे वातावरण ठीक नाहिये. मला तर वाटतं ड्रेसिंग रूममध्ये मुंबई आणि दिल्ली असे दोन गट आहेत.” असे वक्तव्य मुश्ताकने एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना केले.

विराट कोहली लवकरच संन्यास घेणार

तसेच तो पुढे म्हणाला, मला वाटतं कोहली लवकरच T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होईल. मात्र, तो इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत राहील.मला तर हेच वाटते की, विराटला या स्वरूपात जितकं क्रिकेट खेळायचे होते, तितके त्याचे खेळून झालं आहे. असा खळबळजनक दावादेखील मुश्ताकने यावेळी केले.

यासोबतच त्याने टीम इंडियाच्या टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2021) स्पर्धेतील खराब कामगिरीवरही भाष्य केले. आयपीएलमुळे भारतीय संघ फ्लॉप ठरला. मला वाटते की, त्यांचे खेळाडू विश्वचषकाच्या खूप आधीपासून बायो बबलमध्ये आहेत आणि त्यामुळे ते थकले होते. असे मत मुश्ताकने यावेळी व्यक्त केले.

First published:

Tags: T20 league, Team india, Virat kohli