नवी दिल्ली, 01 जून : भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या एजबॅस्टन कसोटीपूर्वी त्याच्या 'पुष्पा' अवताराचा ट्रेलर दाखवला आहे. त्याने जणू संकेत दिले आहेत की, तो येत्या कसोटी सामन्यातही त्याच पुष्पा स्टाईलमध्ये खेळताना दिसणार आहे. पुष्पा हा एक दक्षिण भारतीय चित्रपट आहे, ज्याची सिग्नेचर स्टाइल खूप प्रसिद्ध होत आहे.
गेल्या वर्षी भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळली गेली होती. त्यानंतर कोरोना रुग्णसंख्या वाढल्याने पाचवा कसोटी सामना होऊ शकला नाही, तो सामना आजपासून (1 जुलै) खेळवला जात आहे. सध्या भारतीय संघाने मालिकेत 2-1 अशी आघाडी कायम ठेवली आहे.
विराट कोहलीचा व्हिडिओ व्हायरल -
विराट कोहलीने सामन्यापूर्वी नेट सरावात चांगलाच घाम गाळला. यादरम्यान, जेव्हा तो सरावासाठी तयार होत होता, तेव्हा त्याने सलामीवीर शुभमन गिलसमोर 'पुष्पा' चित्रपटाची सिग्नेचर स्टाईल केली आणि गिलला काहीतरी बोलायला सुरुवात केली. कोहलीचा आवाज रेकॉर्ड होऊ शकला नसला तरी त्याचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
हे वाचा -
Rahul Dravid on Virat Kohli: 'विराटकडून मला शतक नको', निर्णायक टेस्टपूर्वी द्रविडनं केलं जाहीर!
चांगल्या कामगिरीची अपेक्षा -
खुद्द कोहलीनेही एक फोटो शेअर करत या मॅचसाठी आता वाट पाहत असल्याचे सांगितले होते. या फोटोमध्ये कोहली एजबॅस्टन स्टेडियमच्या ट्रॅकवर धावताना दिसत आहे. कोहलीने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजाही त्याच्यासोबत धावताना दिसत आहे.
हे वाचा -
Video: नॅशनल रेकॉर्ड तोडत नीरज चोप्राचा भाला पुन्हा सुसाट; डायमंड लीगमध्ये जबरदस्त फेकी
भारतीय कसोटी संघ:
जसप्रीत बुमराह (क), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, मयंक अग्रवाल, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत, बी. , प्रसिद्ध कृष्णा., मोहम्मद सिराज, उमेश यादव.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.