Home /News /sport /

'हा तर लग्नाचा पहिलाच वाढदिवस, कारण...', विराटची अनुष्कासाठी 'मन की बात'!

'हा तर लग्नाचा पहिलाच वाढदिवस, कारण...', विराटची अनुष्कासाठी 'मन की बात'!

Photo-Virat Kohli Instagram

Photo-Virat Kohli Instagram

भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Anushka Wedding Anniversary) यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. यानिमित्त विराट कोहलीने (Virat Kohli) अनुष्का शर्मासाठी (Anushka Sharma) इमोशनल मेसेज लिहिला आहे.

  मुंबई, 11 डिसेंबर : भारतीय टेस्ट टीमचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा (Virat Anushka Wedding Anniversary) यांच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. यानिमित्त विराट कोहलीने (Virat Kohli) अनुष्का शर्मासाठी (Anushka Sharma) इमोशनल मेसेज लिहिला आहे. विराटने अनुष्का आणि मुलगी वामिकासोबतचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केले आहेत. या फोटोंसोबतच त्याने भावुक असं कॅप्शन दिलं आहे. '4 वर्षांपासून तु माझे विनोद आणि माझा आळशीपणा सहन करत आहेस. मी कितीही त्रासदायक असलो तरीही तू माझ्यावर प्रेम करतेस, 4 वर्षांपासून मी जसा आहे तसंच तू मला स्वीकारतेस. 4 वर्षांपासून देवाने आपल्याला सर्वोत्तम आशिर्वाद दिले. सगळ्यात प्रामाणिक, प्रेम करणाऱ्या आणि धाडसी मुलीसोबतच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली. संपूर्ण जग जरी विरोधात गेलं तरीदेखील तिने मला योग्य बाजूसाठी उभं राहण्याची प्रेरणा दिली. तुझ्यामुळे मी पूर्ण झालो आहे. मी कायमच तुझ्यावर प्रेम करेन. हा दिवस माझ्यासाठी खास आहे, कारण कुटुंब म्हणून हा आपल्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आहे. या चिमुकलीमुळे आपलं आयुष्य पूर्ण झालं आहे,' असं विराट कोहली त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे.
  View this post on Instagram

  A post shared by Virat Kohli (@virat.kohli)

  अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट 2013 मध्ये भेटले होते जेव्हा दोघे एका शॅम्पूची जाहिरात करत होते. इथून दोघांनी डेटिंगला सुरुवात केली आणि त्यानंतर 11 डिसेंबर 2017 मध्ये दोघांचं इटलीमध्ये लग्न झालं. 11 जानेवारी 2021 ला विराट आणि अनुष्काला मुलगी झाली. या दोघांनी मुलीचं नाव वामिका ठेवलं. विराटनं आपल्या मुलीच्या जन्माची घोषणा करण्यासाठी जे ट्विट केलं होतं ते, या वर्षीचं सर्वांत जास्त लाईक्स मिळवलेलं ट्विट (Most Liked Tweet) ठरलं. विराटच्या त्या ट्विटला आतापर्यंत जगभरातून 5 लाख 39 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. विराटच्या मुलीच्या जन्माचं ट्विट जरी सर्वांत जास्त लोकप्रिय झालं असल तरी अद्याप कोहली आणि अनुष्कानं वामिकाला मीडियाच्या कॅमेऱ्यांपासून दूर ठेवलं आहे. आपल्या पहिल्या बाळाच्या जन्मासाठी, कोहलीने पॅटर्निटी लिव्हदेखील (paternity leave) घेतली होती. त्यासाठी त्यानं अॅडिलेडमधील पहिल्या टेस्टनंतर ऑस्ट्रेलियाचा दौरा मधूनच सोडला होता.
  Published by:Shreyas
  First published:

  Tags: Anushka sharma, Virat kohli

  पुढील बातम्या