Home /News /sport /

72 तासांपासून विराट कोहलीचा मोबाईल स्विच ऑफ, भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

72 तासांपासून विराट कोहलीचा मोबाईल स्विच ऑफ, भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ

टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. बीसीसीआय आणि निवड समितीच्या या निर्णयामुळे वादाला तोंड फुटलं आहे. कॅप्टन्सी गमावल्यानंतर 72 तासांनंतरही विराटने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

पुढे वाचा ...
    मुंबई, 11 डिसेंबर : टीम इंडियाचा स्टार खेळाडू विराट कोहलीला (Virat Kohli) वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवण्यात आलं आहे. बीसीसीआय आणि निवड समितीच्या या निर्णयामुळे वादाला तोंड फुटलं आहे. 8 डिसेंबरला बीसीसीआयने (BCCI) विराटऐवजी रोहित शर्मा (Rohit Sharma) वनडे टीमचाही कॅप्टन असेल, अशी घोषणा केली होती. या घोषणेला आता 72 तास होत आहेत, पण विराट कोहलीने यावर अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यातच आता विराट कोहलीचे लहानपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा (Rajkumar Sharma) यांनी खळबळजनक दावा केला आहे. विराट कोहलीचा फोन स्विच ऑफ असल्याचं राजकुमार शर्मा यांनी सांगितलं. टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) आपण या फॉरमॅटची कॅप्टन्सी सोडणार असल्याचं विराटने आधीच सांगितलं होतं, पण बीसीसीआयने विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरूनही हटवलं. 'विराटकडून टेस्ट टीमची कॅप्टन्सीही हिसकावली जाईल', क्रिकेटपटूचा खळबळजनक दावा 'मी अजून विराटसोबत बोललो नाही, कराण त्याचा फोन स्विच ऑफ आहे. याचं कारण मला माहिती नाही. कोहलीने टी-20 टीमची कॅप्टन्सी स्वत:च सोडली, असं मला वाटतं. निवड समितीने विराटला तेव्हाच तू मर्यादित ओव्हरच्या टीमची कॅप्टन्सी सोड असं सांगायला पाहिजे होतं. त्याला असं कॅप्टन्सीवरून हटवणं योग्य नव्हतं,' असं राजकुमार शर्मा खेल निती पॉडकास्टमध्ये बोलले. 'विराटला वनडे टीमच्या कॅप्टन्सीवरून हटवलं, यावर निवड समितीने कोणतंही कारण दिलं नाही. बीसीसीआय आणि निवड समितीला नेमकं काय पाहिजे आहे, हे मला माहिती नाही. या निर्णयात कोणतीही पारदर्शकता दाखवण्यात आली नाही. हे सगळं का झालं, समजत नाही,' असं दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळलेले राजकुमार म्हणाले. 56 वर्षांच्या राजकुमार यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दिलेल्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. 'विराटला टी-20 टीमची कॅप्टन्सी न सोडण्याबाबत सांगण्यात आलं होतं, असं सौरव गांगुली म्हणाल्याचं मी बघितलं. माझ्यासाठी गांगुलीचं हे वक्तव्य धक्कादायक होतं, कारण आजू-बाजूला ज्या गोष्टी चालल्या होत्या, त्या पूर्णपणे वेगळ्या होत्या,' असं विधान राजकुमार यांनी केलं. रोहित शर्माच्या जिद्दीचा विराटला फटका, कॅप्टन होण्यापूर्वी BCCI समोर ठेवली होती अट
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या