मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

विराट बनला 'Money Heist'चा प्रोफेसर; किलर लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल

विराट बनला 'Money Heist'चा प्रोफेसर; किलर लूक सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Virat Kohli New Look: विराट कोहलीचा एक आगळावेगळा लुक समोर आला असून हा फोटो सोशल मीडियवर तुफान व्हायरल होतं आहे.

Virat Kohli New Look: विराट कोहलीचा एक आगळावेगळा लुक समोर आला असून हा फोटो सोशल मीडियवर तुफान व्हायरल होतं आहे.

Virat Kohli New Look: विराट कोहलीचा एक आगळावेगळा लुक समोर आला असून हा फोटो सोशल मीडियवर तुफान व्हायरल होतं आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 24 मे: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीनं आपल्या तुफानी फटकेबाजीनं अनेकदा एकहाती मैदान गाजवलं आहे. तो आपल्या आक्रमक खेळीसोबतच आपल्या लूकसाठीही तितकाच प्रसिद्ध आहे. त्यानं आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यापासून अनेकवेळा आपली हेअर स्टाईल आणि बिअर्ड स्टाईल बदलली आहे. पण प्रत्येक वेळी त्यानं हेअर स्टाईलसोबत केलेला नवीन प्रयोग त्याच्या चाहत्यांसाठी ट्रेन्ड ठरला आहे. अशातचं त्याचा आणखी एक आगळावेगळा लूक समोर आला आहे. त्याचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं आहे.

त्याचा हा  नवीन लूक त्यानं आगामी इंग्लड दौऱ्यासाठी बनवला असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरू आहे. विराटच्या या नवीन लूकची तुलना जगभरात गाजलेल्या 'मनी हाइस्ट' वेब सीरीजमधील मुख्य पात्र प्रोफेसरशी केली जात आहे. या लुकमध्ये विराटनं प्रोफेसरप्रमाणे हेअर स्टाईल आणि दाडी वाढवली आहे. यासोबत त्यानं प्रोफेसरप्रमाणे चष्माही परिधान केला आहे. विराटचा हा नवा लुक अनेकांना घायाळ करत आहे. ट्विटरवर लोकांनी दिलेल्या प्रतिक्रियांनुसार, विराटनं आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी हा नवीन लुक केला असल्याचं म्हटलं जात आहे.

येत्या 2 जूनला भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. तत्पूर्वी भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू मुंबईत क्वारंटाइन झाले आहेत. इंग्लंडला गेल्यानंतरही त्यांना किमान तीन दिवस क्वारंटाइनमध्ये राहावं लागणार आहे. हा सामना भारत आणि इंग्लंड दोन्ही देशांसाठी खूप महत्त्वाचा ठरणार आहे. कसोटी क्रिकेटमध्ये आपला दबदबा राखण्यासाठी दोन्ही संघ हा सामाना जिंकण्यासाठी जोरदार प्रयत्न करतील.

हे ही वाचा-WTC Final : मुंबईत जन्मला, मग न्यूझीलंडला गेला, आता भारताविरुद्धच खेळणार

इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहलीनं कोरोनाची लस टोचून घेतली आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून लस घेतानाचा फोटो शेअर केला होता. यावेळी त्यानं देशातील नागरिकांना लस सुरक्षित असल्याचं सांगत लसीकरणासाठी जागरुक केलं होतं. विराटव्यतिरिक्त टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मानंही आपल्या पत्नीसह कोरोनाची लस घेतली.

First published:

Tags: Cricket news, Virat kohli