मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

कोणत्या बॉलरने सर्वाधिक त्रास दिला असता? विराटने घेतलं या खेळाडूचं नाव

कोणत्या बॉलरने सर्वाधिक त्रास दिला असता? विराटने घेतलं या खेळाडूचं नाव

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. इंग्लंडला रवाना होण्याआधी टीम कोरोनाचे नियम पाळत आहे. जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 31 मे: टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या मुंबईच्या हॉटेलमध्ये क्वारंटाईन आहे. इंग्लंडला रवाना होण्याआधी टीम कोरोनाचे नियम पाळत आहे. जून महिन्यात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात इंग्लंडमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात 5 टेस्ट मॅचची सीरिज होईल. सध्या हॉटेलमध्ये कैद असलेले खेळाडू स्वत:चा वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली इन्स्टाग्रामवर सक्रीय आहे. शनिवारी त्याने आपल्या चाहत्यांसाठी प्रश्न उत्तराच्या तासाचं आयोजन केलं होतं. चाहत्यांनी विचारलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं विराटने दिली. प्रश्न-उत्तरांच्या या सेशनमध्ये चाहत्याने विराटला विचारलं, की भूतकाळातल्या कोणत्या बॉलरने तुला सर्वाधिक त्रास दिला असता किंवा सर्वाधिक धोकादायक होता? विराट कोहलीने पाकिस्तानचा माजी फास्ट बॉलर वसीम अक्रमचं (Wasim Akram) नाव घेतलं. वसीम अक्रम आणि वकार युनूस या जोडगोळीने जगातल्या सर्वोत्तम बॅट्समनना भरपूर त्रास दिला होता. वसीम अक्रमने टेस्ट क्रिकेटमध्ये 414 आणि वनडेमध्ये 502 विकेट घेतल्या होत्या. हे दोन्ही बॉलर आपल्या वेगासह रिव्हर्स स्विंगसाठी प्रसिद्ध होते. वसीमने टेस्ट क्रिकेटमध्ये 2,898 रन आणि वनडेमध्ये 3,717 रन केले. 1996-97 मध्ये अक्रमने झिम्बाब्वेविरुद्ध टेस्टमध्ये 257 रनची खेळी केली होती. भारत-न्यूझीलंड यांच्यात 18 जून ते 22 जून या कालावधीमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल होणार आहे. 2013 चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही, त्यामुळे ही स्पर्धा जिंकून पुन्हा एकदा आयसीसी ट्रॉफी पटकावण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल.
    Published by:Shreyas
    First published:

    Tags: Cricket news, Team india, Virat kohli

    पुढील बातम्या