ICC Award : विराटचा ट्रिपल धमाका, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

ICC Award : विराटचा ट्रिपल धमाका, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच खेळाडू

भारताचा कर्णधार विराट कोहलीला आयसीसीच्या दोन्ही संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे.

  • Share this:

दुबई, 22 जानेवारी : आयसीसीने 2018 या वर्षातील कसोटी आणि वनडे संघांची घोषणा केली. यात भारताचा कर्णधार विराट कोहलीची आयसीसीच्या दोन्ही संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती केली आहे. इतकंच नाही तर वनडे आणि कसोटीसह त्याला क्रिकेटर ऑफ द इयरने गौरवण्यात आलं आहे.

विराट कोहलीशिवाय आयसीसीच्या संघात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा देखील समावेश करण्यात आला आहे. बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत त्याने चमकदार कामगिरी केली होती.

विराटची आयसीसीच्या वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे. त्याचबरोबर 2018 या वर्षाचा क्रिकेटर ऑफ दि इयरचाही पुरस्कार त्याने पटकावला. तिन्ही प्रकारात क्रिकेटर ऑफ दि इयर ठरलेला विराट कोहली जगातील पहिलाच खेळाडू ठरला आहे.

भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली 2018 मध्ये वनडे आणि कसोटीत जबरदस्त कामगिरी केली आहे. यात ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याचा विक्रम केला.

विराट कोहलीने 2018 मध्ये 13 कसोटी सामन्यात 5 शतकांच्या मदतीने 1322 धावा केल्या. तसेच 14 वनडे सामन्यात सहा शतकांसह 1202 धावा केल्या आहेत.


आयसीसी 2018 चा कसोटी संघ : टॉम लॅथम (न्यूझीलंड), दिमुथ करुणारत्‍ने (श्रीलंका), केन विलियम्सन (न्यूझीलंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), हॅन्री निकोलस (न्यूझीलंड), ऋषभ पंत (भारत), जेसन होल्‍डर (वेस्‍टइंडीज), कागिसो रबाडा (दक्षिण आफ्रीका), नाथन लायन (ऑस्‍ट्रेलिया), जसप्रीत बुमराह (भारत) मोहम्‍मद अब्‍बास (पाकिस्‍तान)


आयसीसी 2018 चा वनडे संघ : रोहित शर्मा (भारत), जॉनी बेयरस्‍टॉ (इंग्लंड), विराट कोहली (भारत, कर्णधार), जो रूट (इंग्लंड), रॉस टेलर (न्यूझीलंड), जोस बटलर (इंग्लंड), बेन स्‍टोक्‍स (इंग्लंड), मुस्‍तफिजुर रहमान (बांग्‍लादेश), राशिद खान (अफगाणिस्‍तान), कुलदीप यादव (भारत) जसप्रीत बुमराह (भारत).


VIDEO : भारताच्या ऐतिहासिक विजयावर विरुष्कानं असं केलं सेलिब्रेशन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 22, 2019 12:56 PM IST

ताज्या बातम्या