जबरा फॅनचं विराटला सरप्राईज! अंगावरचे 15 टॅटू पाहून अनुष्कालाही बसेल धक्का

जबरा फॅनचं विराटला सरप्राईज! अंगावरचे 15 टॅटू पाहून अनुष्कालाही बसेल धक्का

भारत-दक्षिण आफ्रिका सामन्याआधी विराटला मिळालं सरप्राईज.

  • Share this:

विशाखापट्टणम, 02 ऑक्टोबर : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना होत आहे. या सामन्यात भारतानं टॉस जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या सामन्याआधी कॅप्टन कोहलीला एक छोटसं सरप्राईज मिळालं. सामन्याआधी विराटनं घेतलेल्या पत्रकार परिषदेआधी त्याचा जबरा फॅन त्याची वाट पाहत होता. दरम्यान विराटलाही या चाहत्याला पाहून तो सेल्फी किंवा ऑटोग्राफ घेईल असे वाटले होते. मात्र तसे झाले नाही.

विराट कोहली सध्या सर्वात जास्त कसोटी सामने जिंकणारा कर्णधारा झाला आहे. दरम्यान या कसोटी मालिकेत एक पराभव भारतासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यासाठी विराटसेनेनं जय्यत तयारी केली आहे. त्यामुळं फॉर्ममध्ये नसलेल्या ऋषभ पंतला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यात सामन्याआधी विराटला एक खास व्यक्ती भेटण्यासाठी आला होता.

विराटला भेटण्यासाठी आलेली ही खास व्यक्ती होती, पिंटू बेहरा. विराटच्या जबऱ्या फॅननं त्याला भेट दिल्यानंतर टी-शर्ट काढण्याची इच्छा व्यक्त केली. त्याच्या चाहत्यानं टी-शर्ट काढल्यानंतर विराट हैराण झाला. कारण या चाहत्यांच्या अंगावर एक नाही तर तब्बल 15 टॅटू आहेत, फक्त विराट कोहलीच्या नावाचे.

ओडिशाच्या बरहामपूर येथे राहणारा बेहरानं आपल्या टॅटूबाबत सांगताना, “मी सर्वात आधी 2016मध्ये टॅटू केला बोता. त्यानंतर सलग 15 टॅटू गोंदवून घेतले. सगळ्यात आधी मी छातीवर विराटचा चेहरा गोंदवून घेतला होता. वर्ल्ड कप 2019मध्ये त्यानं आणखी टॅटू गोंदवून घेतले”, असे सांगितले.

बेहराच्या टॅटूमध्ये त्यानं विराटचा जर्सी क्रमांक, पाकिस्ता विरोधात केलेल्या अर्धशतकानंतर सचिननं त्याची केलेले कौतुक, त्याचे कोच राजकुमार शर्मा, अनुष्का शर्माला फ्लाईंग किस देताना विराट, विराटचा अर्जुन पुरस्कार, खेल रत्न अशे टॅटू आपल्या शरीरावर गोंदवून घेतले आहेत.

महात्मा @ 150 : नाशिकमध्ये 30 फुटांचं धातू शिल्प उभं करून बापूंना अभिवादन

First published: October 2, 2019, 11:06 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading