विचित्र आजारामुळे आपोआप तुटतात तिची हाडं, विराट भेटल्यावर झाली भावूक; पाहा VIDEO

विचित्र आजारामुळे आपोआप तुटतात तिची हाडं, विराट भेटल्यावर झाली भावूक; पाहा VIDEO

भारताचा कर्णधार विराट कोहलीची मोठी चाहती असलेल्या पूजा शर्माला एक विचित्र आजार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटीनंतर विराटने तिची भेट घेतली त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

इंदूर, 17 नोव्हेंबर : सेलिब्रिटींची भेट व्हावी म्हणून चाहते कितीही वाट बघतात. आपल्या आवडत्या सेलिब्रिटीला भेटण्याचा आनंद काही वेगळाच असतो. क्रिकेटमध्ये तर चाहते चालू सामन्यात मैदानात घुसण्याचे प्रकार होतात. आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने त्याच्या एका चाहतीची भेट घेतल्यावर ती भावनिक झाली. विराटची या चाहतीला एक विचित्र आजार आहे. तिला हात लावताच हाडं तुटतात. पूजा टीम इंडियाला सपोर्ट कऱण्यासाठी स्टेडियममध्ये पोहचली होती. तिला विराटला भेटायचं होतं. कसोटी जिंकल्यानंतर विराट बाहेर पडत असताना खुर्चीत बसलेली पूजा त्याला दिसली. तेव्हा विराटने तिची विचारपूस केली आणि क्रिकेटच्या टोपीवरच ऑटोग्राफ दिली.

विराट कोहलीला भेटण्याचं स्वप्न पूजाचं होतं. इंदूरमध्ये राहणाऱ्या पूजा शर्माचं शिक्षण 12 वी पर्यंत झालं आहे. दिव्यांग असल्यानं ती घरीच असते. विराटची चाहती असलेली पूजाला टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी प्रत्येक सामना स्टेडियममध्ये पाहण्याची इच्छा आहे.

पूजाने म्हटलं की, मी विराटची मोठी चाहती आहे. त्याचे सर्व सामने बघितले आहेत. मी पहिल्यांदाच स्टेडियममध्ये सामना पाहिला. त्याला भेटून आनंद झाला. आज त्याला भेटण्याचं स्वप्न पूर्ण झालं. तसंच त्याची अॅडलेडमधील 141 धावांची खेळी अजुनही लक्षात आहे असंही तिने विराटला सांगितलं.

सुखलिया इथं राहणारी 24 वर्षीय पूजाचे वडील ललित शर्मा यांनी सांगितलं की, पूजाला असा विचित्र आजार आहे की तिची हाडं आपोआप तुटतात. तुटलेली हाडं एक दोन दिवसात पुन्हा जोडली जातात. शाळेत जेव्हा टीचर तिचा हात पकडून उभा करायचे तेव्हा हाडं तुटायची. तिने 12 वी नंतर कॉम्प्युटर कोर्स केला पण आजाराचा त्रास वाढल्यानं घराबाहेर पडणं कठिण झालं.

डिलिव्हरीनंतरही HOT दिसतेय अर्जुन रामपालची गर्लफ्रेंड, पाहा लेटेस्ट PHOTO

Published by: Suraj Yadav
First published: November 17, 2019, 10:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading