IPL 2019 : विराटनं केलेली ही मस्करी अश्विनला मात्र खटकणार, पाहा VIDEO

IPL 2019 : विराटनं केलेली ही मस्करी अश्विनला मात्र खटकणार, पाहा VIDEO

सुनील नारायणची सतरावी ओव्हर आणि विराटनं केलं असं काही...

  • Share this:

कोलकाता, 19 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात अनेक नवनवीन विक्रम, किस्से आणि वाद होत असतात. मात्र कोलकाता आणि बंगळुरू यांचा सामना गाजवला तो, बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहलीनं.आपल्या संघाचं प्ले ऑफच स्वप्न शाबुत ठेवण्यासाठी विराटनं तब्बल तीन वर्षांनंतर शतक ठोकलं. त्याच्या शतकी खेळीच्या जोरावर बंगळुरूनं कोलकाता संघासमोर 213 धावांचे आव्हान दिलं. पण त्याआधी एका मजेशीर प्रसंग घडला. सतराव्या ओव्हरमध्ये शेवटच्या चेंडूवर सुनील नारायण गोलंदाजी करताना विराटनं सगळ्यांनाच ट्रोल केलं, मात्र त्याची ही मस्करी आर.अश्विनला खटकणारी असेल.

तर, झालं असं की या ओव्हरमध्ये शेवटचा बॉल टाकताना सुनील नारायण थांबला आणि विराटनं नॉन स्ट्रायकर्स एंडला आपली बॅट टेकवली आणि नारायणकंड बघुन मिश्किल हसला.यामुळं चाहत्यांना नक्कीच अश्विन आणि बटलर यांचा बादग्रस्त रन आऊट आठवला. अश्विननं बटलरला मंकडिंग पद्धतीनं बाद केल होतं. क्रिकेट रसिकही अश्विनच्या या कृतीवर नाराज होतो. त्यांनी अश्विनवर सडकून टीकाही केली होती. या सगळ्या प्रकरणामुळं अश्विनही नाराज झाला होता, त्यामुळं आता विराटची ही मस्करी अश्विनच्या जिव्हारी लागणार एवढं मात्र नक्की.


मंकड आऊट म्हणजे काय?

40च्या दशकात भारताकडून खेळणारा सलामीवीर होता विनू मंकड. विनू मंकड डावखुरा स्लो बोलर म्हणूनही खेळत असे. भारताचा हा अष्टपैलू महान खेळाडू 1947-48 दरम्यान अशाच पद्धतीच्या वादात अडकला होता. त्या वेळी भारताचा संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विनू मंकडने बिल ब्राऊन या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला वेगळ्याच पद्धतीने आऊट केलं. बिल नॉन स्ट्राईकिंग एंडला असतानाच बोलिंग करत असलेल्या मंकडने अचानक बेल्स उडवल्या. क्रिकेटच्या नियमाप्रमाणए क्रीजमध्ये नसल्याने बिल ब्राऊन आऊट झाला.

यावरून ऑस्ट्रेलियाच्या संघाने थैमान घातलं. ऑस्ट्रेलियाच्या माध्यमांनीही भारतीय गोलंदाज कसा चुकीचं वागला याबद्दल लिहून विनू मंकड यांच्याविरोधात रान उठवलं. आजही हे यापद्धतीनं धावबाद करणं खेळाच्या उस्फूर्त भावनेच्या विरोधात असल्याचं मानलं जातं. अशा पद्धतीने आऊट झालं की मंकड डिसमिसल असं म्हटलं जात. मंकडिंग असं क्रियापदच क्रिकेटच्या डिक्शनरीमध्ये रूढ झालं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 11:37 PM IST

ताज्या बातम्या